auto expo 2023 maruti first electric suv Maruti eVX unveiled check details here  
विज्ञान-तंत्र

Auto Expo 2023 : मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच; बाजारात कधी येणार? वाचा

सकाळ डिजिटल टीम

auto expo 2023 : ऑटो एक्सपो 2023 च्या पहिल्याच दिवशी मारुती सुझुकीने धमाका केला आहे. अनेक दिवसांपासून कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची वाट पाहणाऱ्या लोकांना नवीन वर्षाचे सरप्राईज मिळाले आहे. ऑटो एक्सपोच्या सुरुवातीला, मारुती सुझुकीने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV कॉन्सेप्ट कार लोकांसमोर सादर केली.

कंपनीने याचे नाव मारुती ईव्हीएक्स (Maruti EVX) ठेवले आहे. ज्याला EV एक्स असे म्हटले जातेम्. कंपनीने आता या कारसह स्पष्ट केले आहे की येत्या काही दिवसांत ती इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. माहितीनुसार, यासाठी लोकांना 2025 अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ही कार तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये रस्त्यावर दिसेल.

कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार टोयोटासोबत मिळून बनवण्यात आली आहे. त्याची टोयोटा आवृत्तीही भारतात लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कार बॉर्न-ईव्ही प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. कंपनी येत्या काही वर्षांत आणखी अनेक इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी काम करत आहे. या सर्व कारमध्ये देखील कंपनी बॉर्न-ईव्ही प्लॅटफॉर्म वापरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

Maratha Youth: मराठा तरुणांसाठी दिलासा! महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी लवकरच शिथिल होणार; ८०० कोटींचा निधी मागणार

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

SCROLL FOR NEXT