Maruti Suzuki Jimny 5 door  Sakal
विज्ञान-तंत्र

Auto Expo 2023: प्रतिक्षा संपली! बहुचर्चित Maruti Suzuki Jimny 5 door लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

मारुती सुझुकीने ५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिली ऑफ रोड एसयूव्ही Maruti Suzuki Jimny 5 door भारतात लाँच केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maruti Suzuki Jimny 5 door unveiled: ऑटोमोबाइल जगतातील सर्वात मोठा इव्हेंट Auto Expo 2023 ला भारतात सुरुवात झाली आहे. या इव्हेंटमध्ये मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) ५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिली ऑफ रोड एसयूव्ही मारुतू जिम्नी ५ डोरला (Maruti Suzuki Jimny 5 door) भारतात लाँच केले आहे. लाँचिंगसोबतच एसयूव्हीचे बुकिंग देखील सुरू झाले आहे.

Maruti Suzuki Jimny 5 door चे बुकिंग सुरू

Maruti Suzuki Jimny 5 door ला तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. तसेच, मारुती सुझुकीच्या डीलरशिपकडे जाऊन देखील बुकिंग करता येईल. या नवीन ऑफ रोड एसयूव्हीच्या बुकिंगसाठी तुम्हाला ११ हजार रुपये टोकन रक्कम द्यावी लागेल. गाडीच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. मात्र, एसयूव्हीची किंमत जवळपास १० लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Maruti Suzuki Jimny 5 door मध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन

मारुती सुझुकीने जिम्नी ५ डोरमध्ये ४ सिलेंडर १.५ लीटर के-१५-बी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०१ बीएचपी पॉवर आणि १३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. तसेच, ४X४ व्हील ड्राइव्ह फीचर देखील मिळते.

Maruti Suzuki Jimny 5 door ही ऑफ रोड एसयूव्ही सेगमेंटमध्ये लवकरच लाँच होणाऱ्या Mahindra Thar 5 Door ला टक्कर देईल.

ही एसयूव्ही ग्रेनाइट ग्रे, नेक्सा ब्लू, ब्लुइश ब्लॅक, पर्ल आर्कटिक व्हाइट, काइनेटिक यलो आणि सिजलिंग रेड रंगात येते.

हेही वाचा: Flipkart Sale: सुरू होतोय फ्लिपकार्टचा भन्नाट सेल, टीव्ही-फ्रिज निम्म्या किंमतीत; iPhone खूपच स्वस्तात

Maruti Suzuki Fronx SUV देखील सादर

कंपनीने Jimny 5 door सोबतच Fronx SUV ला देखील सादर केले आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये ४ सिलेंडर १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जिम्नी ५ डोरसोबतच या एसयूव्हीचे देखील बुकिंग सुरू झाले आहे.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

Dubai Work Reality : दुबईतील झगमगाटामागे दडलंय भयाण वास्तव! भारतीय तरुणाने अवघ्या २ मिनिटांत दाखवली काळी बाजू, पाहा VIDEO

‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ पाठराखीण मालिकेतील अभिनेत्रींचा मराठमोळ्या लूकमध्ये भन्नाट डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : पुण्यात पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता दोन शहराध्यक्ष

Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

SCROLL FOR NEXT