Car Sakal
विज्ञान-तंत्र

Auto Expo 2023: Maruti Suzuki करणार धमाका! हटके फीचर्ससह येणार भन्नाट इलेक्ट्रिक कार

जानेवारी महिन्यात Auto Expo 2023 इव्हेंट पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये मारुती सुझुकी आपल्या नवीन गाड्यांना सादर करेल.

सकाळ डिजिटल टीम

Auto Expo 2023: जानेवारी महिन्यात Auto Expo 2023 इव्हेंट पार पडणार आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठ्या इव्हेंटपैकी हा एक आहे. या इव्हेंटमध्ये ऑटोमोबाइल कंपनी Maruti Suzuki आपल्या नवीन कार्सला सादर करणार आहे. कंपनी नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्ही आणि दोन नवीन एसयूव्ही मॉडेल्सला सादर करेल.

Maruti Suzuki India Limited चे मॅनेजिंग डायरेक्ट आणि सीईओ Hisashi Takeuchi यांनी माहिती दिली की, मारुती सुझुकी ४ दशकांपासून इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम प्रोडक्ट सादर करत आहोत. Auto Expo’23 ही आमच्यासाठी आणखी एक संधी असेल, जेथे आम्हाला भविष्यातील चांगल्या वाहनांना सादर करता येईल.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

कंपनी ऑटो एक्सपोमध्ये YY8 या कोडनेमने इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्हीला सादर करणार आहे. ही गाडी Hyundai Creta च्या डिझाइनपासून प्रेरित असण्याची शक्यता आहे. कंपनी २०२५ मध्ये या गाडीला लाँच करेल. गाडीची रेंज ५०० किमी असू शकते. जवळपास १३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणारी ही कार कंपनीची भारतातील पहिले इलेक्ट्रिक मॉडेल असेल.

कंपनी या अपकमिंग इव्हेंटमध्ये दोन नवीन एसयूव्हींना देखील सादर करेल. यामध्ये Baleno वर आधारित एसयूव्ही आणि Jimny 5-door SUV चा समावेश आहे. याशिवाय, Wagon R चे फ्लेक्स-फ्यूल मॉडेल देखील इव्हेंटमध्ये सादर होऊ शकते. कंपनीने माहिती दिली की, जवळपास १६ नवीन व्हीकल्सला सादर केले जाईल. इव्हेंटमध्ये Grand Vitara, XL6, Ciaz, Ertiga, Brezza, Baleno, आणि Swift चे नवीन मॉडेल देखील पाहायला मिळेल.

हेही वाचा: Mobile Recharge Plans: अवघ्या १५५ रुपयात २८ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग-डेटासह अनेक फायदे, पाहा डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT