Auto Tips  esakal
विज्ञान-तंत्र

Auto Tips : बजाज आणि ट्रायम्फच्या नव्या बाईकची लवकरच एंट्री! टेस्ट राईड दरम्यान दिसली झलक

ट्रायम्फ आणि बजाज ऑटो यांनी नवा प्रयोग करत एक नवीन बाईक बाजारात आणली

सकाळ डिजिटल टीम

Auto Tips : जर तुम्हाला 350cc इंजिन सेगमेंटमध्ये नवीन बाईक घ्यायची असेल, तर तुम्ही नवीन Bajaj-Triumph बाईकची वाट पाहू शकता. कारण ही बाईक याच वर्षी भारतात लॉन्च होणार आहे.

ट्रायम्फ आणि बजाज ऑटो यांनी नवा प्रयोग करत एक नवीन बाईक बाजारात आणली आहे. या बाईकच्या टेस्ट मॉडेलची झलक पाहायला मिळाली. लॉन्चपूर्वीच या बाइकचे बरेच तपशील समोर आले आहेत.

भारतीय रस्त्यावर स्पॉट झालेल्या या ट्रायम्फ-बजाज रोडस्टर बाईक मध्ये स्पोक्ड व्हील आणि क्रॅश गार्ड दिसतोय. रिपोर्ट्सनुसार, या मोटरसायकलमध्ये लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन मिळू शकते. या नवीन बाईकमध्ये काय खास असणार आहे ते जाणून घेऊया.

ट्रायम्फ-बजाजची नवीन बाइक

नवीन ट्रायम्फ-बजाज बाइकला मस्क्यूलर फ्युएल टँक, अपवेस्ट एक्झॉस्ट, सिंगल-पीस सीट, गोल आरसे आणि हेडलाइटच्या वर नंबर प्लेट मिळू शकते. यात ऑल-एलईडी सेटअप, क्रॅश गार्ड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अलॉय व्हील किंवा वायर-स्पोक्ड व्हील मिळू शकतात.सध्या या बाईकचे कलर ऑप्शन, इंधन टाकीची क्षमता याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

ट्रायम्फ-बजाजचे नवीन बाइक इंजिन

रिपोर्ट्सनुसार, या रोडस्टर बाईकमध्ये 350-400cc इंजिन उपलब्ध असेल. सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड तंत्रज्ञान यामध्ये आढळू शकते. हा इंजिन सेटअप 37.5hp पॉवर आणि 30Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतो. मात्र, या बाईकच्या गीअरबॉक्सबाबत माहिती मिळालेली नाही.

या मोटरसायकलच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात येणार आहेत. याशिवाय, टफ हॅडलिंगसाठी बाइकला ड्युअल-चॅनल एबीएस मिळेल. सस्पेंशनसाठी, समोरील बाजूस इनव्हर्टेड फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट मिळेल.

ट्रायम्फ-बजाजची किंमत

या बाईकची किंमत अद्याप समोर आलेली नाही. 2023 च्या अखेरीस ही बाईक इंडीयन मार्केट मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत सुमारे 2.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. लॉन्च केल्यावर, बाईक Zontes GK350, Honda CB300R आणि BMW G 310 R शी स्पर्धा करेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT