Ayodhya Ram Lala eSakal
विज्ञान-तंत्र

Ayodhya Ram Mandir : एआयची कमाल! जिवंत झाले रामलल्ला, हसत हसत पाहिला भक्तांचा आनंद.. व्हिडिओ व्हायरल

या सोहळ्याचे आणि प्रभू श्रीरामांच्या बालरुपातील मूर्तीचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sudesh

Ayodhya Ram Lala : अयोध्येतील भव्य राम मंदिरात सोमवारी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे विधी पार पडल्यानंतर जगभरातील कोट्यवधी श्रीरामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालं. संपूर्ण देशभरात यानिमित्ताने उत्साह होता. या सोहळ्याचे आणि प्रभू श्रीरामांच्या बालरुपातील मूर्तीचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रामलल्लाच्या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये एआय जनरेटेड व्हिडिओचाही समावेश आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये रामलल्ला चक्क गोड हसताना दिसत आहेत. सोबतच ते आपल्या दर्शनाला आलेल्या आनंदी भक्तांकडे पाहतही आहेत. रामलल्लाचे गोड एक्स्प्रेशन्स दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडला. मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ८४ सेकंदांचा अत्यंत शुभ मुहूर्त होता. शुभ वेळ 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंद इतकी होती. अभिषेक झाल्यानंतर रामलल्लाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येतील प्रभू राम लल्ला यांचे लोभस रूप समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT