PVR Pran Pratishtha Live eSakal
विज्ञान-तंत्र

Pran Pratishtha Live : थिएटरमध्ये पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा! 'पीव्हीआर' करणार थेट प्रक्षेपण; किती आहे तिकीट?

सध्या जगभरातील श्रीरामभक्त केवळ 22 जानेवारी 2024 या दिवसाची वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

Sudesh

PVR INOX to show Pran Pratishtha Ceremony Live in Theaters : सध्या जगभरातील श्रीरामभक्त केवळ 22 जानेवारी 2024 या दिवसाची वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहता येत नसलं, तरी थिएटरमध्ये याचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. पीव्हीआर-आयनॉक्स या देशातील अग्रगण्य थिएटर चेनने हा निर्णय घेतला आहे.

यासाठी पीव्हीआरने आज तक या वृत्तवाहिनीशी करार केला आहे. देशभरातील 70 शहरांमधील 160 चित्रपटगृहांमध्ये या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

"अशा भव्य ऐतिहासिक घटनांचा अनुभव देखील भव्य असायला हवा. चित्रपटगृहाच्या पडद्यावर हा सोहळा पाहिल्यामुळे तो अधिक जिवंत वाटेल. या सोहळ्याच्या माध्यमातून भाविकांशी जोडलं जाणं हे आमचं सौभाग्य असेल." असं मत पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेडचे को-सीईओ गौतम दत्ता यांनी व्यक्त केलं.

"भारताच्या इतिहासातील हा एक बहुप्रतिक्षित क्षण आहे. मंदिरात सुरू असणारा मंत्रजागर, तिथली दृश्ये आणि तिथलं वातावरण हे थिएटरमध्येच लोकांना अनुभवता यावं हा आमचा प्रयत्न असणार आहे. हे मनोरंजन नसेल, तर भाविकांना तो क्षण जगता यावा यासाठीचा प्रयत्न असेल." असंही ते म्हणाले.

अवघे 100 रुपये तिकीट

22 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी केवळ 100 रुपयांचं तिकीट आकारलं जाणार आहे. या किंमतीत दर्शकांना पॉपकॉर्न आणि बेव्हरेज कॉम्बो देखील मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT