clubhouse clubhouse
विज्ञान-तंत्र

Clubhouse चे मेसेजिंगसाठी 'Backchannel' हे भन्नाट फिचर लाँच

हे फिचर यजर्सना इतर लोकांना मजकूर संदेश (text messages) पाठविण्याची परवानगी देते. युजर्स या फिचरमुळे आता चॅट ग्रुपही तयार करू शकतात

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: क्लबहाउस या ऑडिओ सोशल मीडिया ऍपने 'बॅकचॅनल' (Backchannel) नावाचे एक नवीन चॅट फीचर आणले आहे. क्लबहाऊसच्या (Clubhouse) अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये क्लबहाउसने म्हटलं आहे की, 'आमच्या प्रिय इंजिनिअर टीमने तयार केलेले युजर्ससाठी नवीन क्लबहाऊस बॅकचॅनल फिरच सादर करीत आहे'

हे फिचर यजर्सना इतर लोकांना मजकूर संदेश (text messages) पाठविण्याची परवानगी देते. युजर्स या फिचरमुळे आता चॅट ग्रुपही तयार करू शकतात. पण यामध्ये सध्यातरी फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्याची सोय नसणार आहे. पण याद्वारे तुम्ही फोटो किंवा व्हिडीओची लिंक पाठवू शकता.

क्लबहाउस आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे

बॅकचॅनल फिचर काय आहे?

जर तुम्ही स्पिकर किंवा ऍपद्वारे बोलत असाल तर ज्यांच्यासोबत बोलत आहात त्यांना पुढे काय विचारायचे याबद्दल तुम्ही तुमच्या सोबतच्या व्यक्तिंना या फिचरद्वारे चॅट करू शकाल. जर तुम्ही श्रोते असाल तर तुम्ही प्रेक्षकांमधील इतर लोकांशी या चॅटद्वारे चॅट करू शकाल.

प्रश्न पाठवा आणि मिळवाही-

जर आपण स्पीकर असाल तर आपण लोकांकडून मेसेजद्वारे प्रश्न घेऊ शकता आणि प्रेक्षकांकडून कोणाला कॉल करायचे हे ठरवण्यासाठी ते वापरू शकता. आपण एखादा श्रोता असल्यास, आपण स्टेजवर येऊ शकत नसलात तरीही आपण प्रश्न सबमिट करू शकता.

या ऍपमध्ये नवीन युजर्स ‘रूम’ (club) म्हणजे ग्रुपमध्ये मध्ये सहभागी होऊ शकतात

क्लब हाउस काय आहे?

क्लबहाउस आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे. क्लबहाउसवर क्लब/ग्रुप तयार करून एकमेकांशी बोलू शकता जसं तुम्ही व्हाट्सऍपवर ग्रुप व्हिडिओ कॉल करता तसेच इथंही तुम्ही ऑडिओ कॉल करू शकता. येथे तुम्ही व्हाट्सऍपसारखे ग्रुप/क्लब तयार करून एकमेकांशी बोलू शकता. क्लबहाउस मध्ये ग्रुपला क्लब बोलले जाते.

या ऍपमध्ये नवीन युजर्स ‘रूम’ (club) म्हणजे ग्रुपमध्ये मध्ये सहभागी होऊ शकतात. त्याठिकाणी तुम्ही डिजिटल मार्केटिंग, बातम्या किंवा अन्य इतर विषयांवर चर्चा करू शकता. अगदी विद्यार्थ्यांची आंदोलने किंवा बिटकॉइनसारख्या विषयांवरही तिथे चर्चा होते. तिथे तुम्ही तुमचं मतही मांडू शकता किंवा इतरांचे फक्त विचार ऐकायचे असतील तर तसाही पर्याय यामध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT