UPI ID Alert eSakal
विज्ञान-तंत्र

UPI ID Alert : 31 डिसेंबरपासून निष्क्रिय होणार इनअ‍ॅक्टिव्ह यूपीआय आयडी, NPCI चा मोठा निर्णय; काय आहे कारण?

नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशनने (NPCI) सर्व बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना याबाबत निर्देश दिले आहेत.

Sudesh

आजकाल ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी सर्व जण यूपीआयचा वापर करतात. अगदी भाजी घेण्यापासून ते कार घेण्यापर्यंत सगळीकडे आपण यूपीआयने पेमेंट करतो. मात्र आता याच यूपीआय आयडीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशनने (NPCI) सर्व बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना याबाबत निर्देश दिले आहेत.

काय आहे निर्देश?

जे यूपीआय आयडी एक वर्षांपासून इनअ‍ॅक्टिव्ह आहेत, म्हणजेच ज्या UPI आयडीने एका वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही अशा आयडींवरील व्यवहार थांबवण्याचे निर्देश NPCI ने दिले आहेत. यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देखील देण्यात आली आहे. त्यानंतर अशा सर्व यूपीआय आयडींवरील व्यवहार थांबवले जातील. अर्थात, पुन्हा एकदा केवायसी प्रक्रिया पार पाडून तुम्ही आपले यूपीआय आयडी पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करु शकता.

तुमची बँक किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप (गुगल पे, फोन पे इ.) याबाबत तुम्हाला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज पाठवेल. यानंतर देखील तुम्ही काहीही अ‍ॅक्शन घेतली नाही, तर तुमच्या यूपीआय आयडीवर निर्बंध लागू होतील. यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं एनपीसीआयने स्पष्ट केलं आहे.

असं करा अ‍ॅक्टिव्ह

तुमचा यूपीआय आयडी अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. केवळ या आयडीवरुन तुम्हाला एखादा व्यवहार करावा लागेल. यानंतर तो आयडी इनअ‍ॅक्टिव्ह राहणार नाही. 31 डिसेंबर नंतर जरी तुमचा यूपीआय आयडी डीअ‍ॅक्टिव्हेट झाला, तरीही तुम्ही केवायसी प्रक्रियेच्या माध्यमातून तो पुन्हा सुरू करू शकाल. (Tech News)

टळणार मोठा धोका

कित्येक वेळा लोक एखाद्या मोबाईल नंबरवरुन यूपीआय आयडी तयार करतात. यानंतर आपला मोबाईल नंबर बदलताना ते त्या नंबरशी जोडलेला UPI ID बंद करणं विसरतात. जुना नंबर बंद झाल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. यामुळे त्याला लिंक असलेला यूपीआय आयडी देखील या व्यक्तीकडे जाण्याचा धोका असतो.

यामुळेच बंद असलेल्या यूपीआय आयडींवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुमचा फोन नंबर तुमच्याकडेच असेल, तर केवायसी प्रक्रिया करुन आणि ओटीपी एंटर करून पुन्हा तुमचा यूपीआय आयडी री-रजिस्टर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT