Battle Stars eSakal
विज्ञान-तंत्र

Battle Stars : बॅटल स्टार्स गेममध्येही दिसतोय क्रिकेट वर्ल्डकप फीव्हर; नवीन स्किन्स आणि अपडेट्स लाँच

Cricket World Cup : बॅटल स्टार्स ही एक 4v4 शूटर गेम आहे.

Sudesh

क्रिकेट आणि गेमिंग आवडणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. बॅटल स्टार्स या गेममध्ये आता आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप संबंधित अपडेट देण्यात आले आहेत. यामुळे गेमिंगची मजा आणखी वाढणार आहे.

बॅटल स्टार्स ही एक 4v4 शूटर गेम आहे. यामध्ये 13 युनिक हीरोंपैकी एक तुम्ही आपला प्लेयर म्हणून निवडू शकता. या गेममध्ये असणारी कलरफुल आर्ट स्टाईल आणि गेमप्ले यामुळे अल्पावधीतच ही गेम लोकप्रिय झाली आहे.

या अपडेटनंतर गेममध्ये प्लेयर्ससाठी नवीन स्किन्स देण्यात आल्या आहेत. यात क्रिकेट वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या देशांच्या जर्सी उपलब्ध आहेत. टीम इंडियाच्या जर्सीसाठी 'टेक्नो' ही स्किन दिली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेसाठी 'झॅक', इंग्लंडसाठी 'लॉर्ड मस्क' आणि ऑस्ट्रेलियासाठी 'रेझर' अशा स्किन्स देण्यात आल्या आहेत.

यामुळे गेमर्सना क्रिकेट वर्ल्डकप आणि गेमिंग या दोन्हीची मजा अनुभवता येणार आहे. तसंच आपल्या आवडत्या क्रिकेट टीमला रिप्रेझेंट करण्याची संधीही मिळणार आहे. यासोबतच कंपनीने गेममध्ये एक नवीन रम्बल मोड देखील दिला आहे. (Gaming News)

रम्बल मोड

TDM Rumble Mode मध्ये यूजर्सना नवीन अपडेटेड मॅप मिळणार आहे. सोबतच यात प्रो कंट्रोल स्कीम देखील देण्यात आली आहे. यामुळे गेममधील विविधता वाढली आहे. यामध्ये सुधारित जॉयस्टिक टच इनपुट मिळणार आहे.

रम्बल मोडमध्ये एक नवीन मुंबई विरुद्ध दिल्ली असा मॅपदेखील देण्यात आळा आहे. यासोबतच रम्बल मोडमध्ये आलेल्या ग्रेनेड्समुळे क्राउड कंट्रोल करता येऊ शकेल. तसंच फायरफाईट्स या अधिक एंगेजिंग आणि टॅक्टिकल होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT