Google Pay, Paytm, PhonePe for payment
Google Pay, Paytm, PhonePe for payment  esakal
विज्ञान-तंत्र

ऑनलाईन व्यवहार करताय? 'या' 5 गोष्टींची नेहमी काळजी घ्या

शिल्पा गुजर

अशा अ‍ॅप्सचा वापर करताना सायबर फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी वापरकर्त्यांनी UPI पेमेंट दरम्यान सुरक्षा उपायांबद्दल जागरूक असले पाहिजे.

Google Pay, Paytm, PhonePe सारखी UPI अ‍ॅप्स जितकी सोयीची तितकीच जोखमीची देखील आहेत. जसे फायदे तसे तोटेही आहेत, त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे. अशा अ‍ॅप्सचा वापर करताना सायबर फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी वापरकर्त्यांनी UPI पेमेंट दरम्यान सुरक्षा उपायांबद्दल जागरूक असले पाहिजे. जसे की अज्ञात लिंकवर क्लिक न करणे, फ्रॉड कॉल्सना उत्तन न देणे, तुमचा पिन नंबर, पासवर्ड कोणतीही माहिती न देणे अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही सायबर फसवणुकीपासून वाचू शकता.

अशावेळी या 5 गोष्टींची नेहमी काळजी घ्या

1) तुमचा पिन (PIN) कधीही कोणाशीही शेअर (Share)करू नका. कोणीही म्हणजे अगदी तुमचा मित्र (Friends), घरातील व्यक्ती, किंवा अगदी तुमचा ज्यावर प्रचंड विश्वास आहे अशी कोणतीही व्यक्ती. कारण पिन शेअर केल्याने तुम्ही फसवणुकीचे बळी ठरु शकता. तुमचा पिन कोणाला समजला तर तो ताबडतोब बदला.

2) मजबूत पासवर्डसह तुमचा फोन (Phone)आणि तुमची पेमेंट (Payment) अ‍ॅप्स लॉक (Apps Lock) करा. साधारणपणे बहुतेक लोक नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी साधे पासवर्ड (Password) वापरतात, हे टाळले पाहिजे. तुमचा पासवर्ड मजबूत करण्यासाठी तुम्ही अक्षरे, संख्या आणि स्पेशल कॅरेक्टर्स वापरू शकता.

3) कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अनेकदा अनोळखी फोन, ईमेलवर क्लिक करण्यासाठी लिंक मिळतात, त्यावर कधीही क्लिक करु नका. कारण अशा लिंक्सवर आकर्षक ऑफर देऊन फसवतात आणि नंतर तुम्हाला पिन, ओटीपी इत्यादी द्यायला सांगतात. मग कॉलर तुमच्या बँकेतून किंवा इतर कोणत्याही एजन्सीमधून कॉल करण्याचे नाटक करतात आणि तुमची सर्व माहिती विचारतात. अशा लिंकवर वारंवार क्लिक करून किंवा अशा कॉलला प्रतिसाद देऊन अनेक व्यक्ती सायबर फसवणुकीच्या बळी ठरल्या आहेत.

4) अनेक पेमेंट अ‍ॅप्सपैकी फक्त एकच अ‍ॅप वापरा आणि तेही विश्वसनीय अ‍ॅप असावे. एकापेक्षा जास्त अ‍ॅप्स वापरल्याने फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

5) प्रत्येक अ‍ॅपला अपडेट करण्याची आवश्यकता असते, त्यानुसार अ‍ॅप चांगली सेवा आणि फायदे देते. तुम्ही कायम हे UPI पेमेंट अ‍ॅपचे लेटेस्ट वर्जन अपडेट केले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT