Artificial Intelligence Benefits eSakal
विज्ञान-तंत्र

Artificial Intelligence : 'एआय' धोका की मौका? आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सामान्यांच्या जीवनावर कसा होईल परिणाम?

प्रत्येक उत्पादनामध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा भाग समाविष्ट होणार असून, त्याचा परिणाम प्रत्येक माणसावर होणार आहे.

सागर बाबर (sagar@comsenseconsulting.com)

सेल्सफोर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क बेनिऑफ आणि ‘ओपनएआय’चे (चॅटजीपीटी) सहसंस्थापक व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांच्यातील संवादाने मी खूपच प्रभावित झालो. संपूर्ण कार्यक्रम आणि त्यातही विशेषत्वाने या दोघांचा संवाद ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपली काम करण्याची पद्धत बदलणार आहे. त्यामुळे कोणतेही काम अधिक जलदगतीने व प्रभावीपणे करणे शक्य होईल.

सॅम म्हणाले, ‘‘प्रत्येक उत्पादनामध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा भाग समाविष्ट होणार असून, त्याचा परिणाम प्रत्येक माणसावर होणार आहे.’’ त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामान्य लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होईल, त्यामुळे आपल्या नोकरीला खरेच धोका निर्माण झाला आहे का, की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा प्रकारची अभूतपूर्व मदत आपल्याला होणार आहे? असे अनेक प्रश्‍न आता निर्माण होत आहेत.

मला असे वाटते, की कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केवळ उद्योगांना नाही, तर सर्वांनाच होणार आहे. विविध क्षेत्रांतील नानाविध पर्यायांपैकी नेमकी कशाची निवड करावी आणि ती का करावी, हे ठरवण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्याला कसा होऊ शकतो, हे लक्षात येईल.

१) उत्पादनाची निवड व खरेदी

बऱ्याच लोकांना स्वतःची आवड-निवड पटकन ठरवता येत नाही. त्यामुळे खरेदीच्या वेळी त्यांचा खूप गोंधळ होतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या अशा लोकांना त्यांच्या आवडीचे पर्याय उपलब्ध करून देतात. त्यासाठी तुम्ही इंटरनेटवर केलेले सर्फिंग, ऑनलाइन खरेदीची हिस्टरी, लाइक्स अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो.

२) शिक्षण

आज लाखो विद्यार्थी ऑनलाइन साधनांवर शिक्षणासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदमचा वापर करून एखाद्या व्यक्तीची आवड ओळखून त्याला शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे नवीन कौशल्ये आत्मसात करणे सहज शक्य होऊ शकते.

३) आरोग्यसेवा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपांमध्ये आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे लोक आपल्या प्रकृतीनुसार, आरोग्याच्या सवयींनुसार कोणते उपचार घ्यावेत याचा निर्णय घेऊ शकतात.

४) आर्थिक नियोजन

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून व्यक्तीच्या खर्चाचे स्वरूप, उत्पन्न आणि त्याची आर्थिक उद्दिष्टे यांचे विश्लेषण करता येते. त्याचा वापर योग्यप्रकारे केल्यास आर्थिक नियोजन करणे शक्य आहे.

५) लेखन आणि संभाषणकौशल्ये

ब्लॉग, लेख लिहिण्यासाठी किंवा एखाद्या गीताला संगीत देण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होऊ शकते. ज्यांना अशा प्रकारचे साहित्य तयार करावे लागते, पण त्यांच्याकडे वेळ नसतो, असे लोक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य वापरातून आवडीच्या विषयावर लिखाण करू शकतात. भाषांतरातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येत असल्याने विविध भाषा शिकणे, बोलणे आणि त्या भाषेत लिहिणेही सोपे होऊ शकते. यामुळे खरोखरच जग जवळ येण्यास मदत होईल.

६) समस्येवरील उपाय

विविध प्रकारच्या माहितीचे विश्‍लेषण करून कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला एखाद्या अवघड कामात मदत करेल किंवा निर्णय घेण्यासही साह्य करेल. व्यवसायातील धोरण ठरवण्यापासून ते वैयक्तिक गोष्टीतील निर्णय घेण्यापर्यंतची अनेक कामे यामुळे साध्य होऊ शकतात. मानवाशी निगडित विविध क्षेत्रांतील माहितीचे संकलन आणि विश्‍लेषण करण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यात आपल्याला हवे तसे बदल करणेही शक्य आहे. नवनवीन गोष्टींसाठी त्यांचा वापर करणेही शक्य आहे. यामुळेच आगामी काळात मानव व कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध अधिक अधोरेखित होणार आहे.

खालील गोष्टींचे भान ठेवा

  • कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रारूपे कोणत्या प्रकारची माहिती संकलित करतात याकडे लक्ष ठेवा. त्या माहितीचा वापर कोणत्या उद्देशाने होऊ शकतो, हे समजून घ्या.

  • माहिती संकलन करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकतेला महत्त्व द्या. योग्य तिथे परवानगी घेण्याचा पर्याय उपलब्ध करा.

  • काही सुरक्षित साधनांमध्ये माहिती सामाईक करण्याची वेळ आल्यास ती प्रक्रिया नैतिकता व मूल्यांना धरून होते आहे ना, याची काळजी घ्या.

  • तुमची वैयक्तिक माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रितपणे काम करतील, तेव्हा निश्‍चितच प्रभावी बदल घडून येतील. त्यासाठी तुम्ही सजग राहणे व नवनवीन गोष्टी समजून घेणे आवश्‍यक आहे.

(लेखक ‘कॉमसेन्स टेक्नॉलॉजीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

(अनुवाद : मयूर भावे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT