best 43 inch smart tv to buy in india on biggest discount in flipkart sale  
विज्ञान-तंत्र

स्वस्तात खरेदी करा 43-इंचाचा Smart TV; फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या सणानिमीत्त लोक जोरात खरेदी करत आहेत .जर तुम्हाला या धनत्रयोदशीला नवीन टीव्ही घ्यायचा असेल, तर शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अप्रतिम ऑफर्स मिळत आहेत. Flipkart Big Diwali Sale मध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत एक खास ऑफर मिळत आहे, ज्यामध्ये 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 43 इंच स्क्रीन आकाराचा टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे.

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलदरम्यान उत्पादनांवर स्टँडर्ड सवलती उपलब्ध आहेत, तसेच बँक कार्डसह विशेष ऑफर देखील दिल्या जात आहेत. कंपनी SBI कार्डद्वारे पेमेंटवर अतिरिक्त 10 टक्के सूट देत आहे. 43 इंच स्क्रीन असलेले टीव्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध नाहीत, परंतु सेल दरम्यान डिव्हाइसवर विशेष सूट मिळत आहे. त्याचा फायदा कसा मिळवायचा ते जाणून घेऊया.

MarQ by Flipkart Innoview वर डिस्काऊंट किती मिळतोय?

43 इंच स्क्रीन आकार असलेल्या MarQ by Flipkart Innoview Smart Android TV ची किंमत आहे 34,999 रुपये पण उत्सवाच्या सेल दरम्यान यावर 9,000 रुपयांची सूट दिली जात आहे.म्हणजेच या स्मार्ट टीव्हीची किंमत ग्राहकांसाठी 19,999 वर पोहोचली आहे.या सवलतीशिवाय, बँक ऑफरसह 1,750 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

सर्व सवलतींचा फायदा घेत हा टीव्ही फक्त 18,249 रुपयांना खरेदी करता येईल. कंपनी हा टीव्ही EMI वर खरेदी करण्याचा पर्याय देत आहे आणि SBI बँक क्रेडिट कार्डने 2,250 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तसेच, या टीव्हीसोबत फक्त 3,499 रुपयांमध्ये Google Audio डिव्हाइस खरेदी करण्याची संधी आहे.

MarQ by Flipkart Innoview चे फीचर्स

MarQ by Flipkart Innoview टीव्हीला 43-इंचाचा LED डिस्प्ले आहे आणि अल्ट्रा UD (4K) रिझोल्यूशन (3840x2160) ला सपोर्ट करतो. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात चार HDMI पोर्ट आणि तीन USB पोर्ट आहेत.यात इनबिल्ट वाय-फायसाठी देखील सपोर्ट देण्यात आला आहे.

डिव्हाइसमध्ये 20W चा ऑडिओ आउटपुट उपलब्ध आहे आणि दोन स्पीकर देण्यात आले आहेत. सराउंड साऊंडसोबतच यात डॉल्बी ऑडिओचाही सपोर्ट आहे. या टीव्हीमध्ये Mediatek CA53 Quad Core प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 1.5GB रॅमसह 8GB इंटरनल स्टोरेज आहे. हे सर्व लोकप्रिय स्ट्रीमिंग आणि OTT अॅप्सना सपोर्ट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का, मुरगुडमध्ये सत्ता समीकरण बदलले

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

SCROLL FOR NEXT