best diwali gift offers on smartwatches earbuds in Amazon Great Indian Festival Sale  
विज्ञान-तंत्र

Best Diwali Gift: 'हे' स्मार्टवॉच, इअरबड्स ठरू शकतात बेस्ट दिवाळी गिफ्ट, येथे पाहा ऑफर्स

सकाळ डिजिटल टीम

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अजूनही सुरू आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्यापैकी बरेच जण भेटवस्तू म्हणून देता येईल असे गॅझेट शोधत आहेत. या सणासूदीच्या काळात ई-कॉमर्स वेबसाइट स्मार्टवॉच आणि इअरबड्ससह विविध उत्पादनांवर अनेक चांगल्या ऑफर देत आहेत. Apple, नॉईज, Boat आणि असे बरेच ब्रँड्स ऑफर देत आहेत. वेबसाइटवर नवीन लॅपटॉपवर देखील अनेक चांगल्या ऑफर दिल्या जात आहेत.

अॅमेझॉन इंडिया खरेदीदारांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आणि अॅक्सिस बँक, सिटी बँक आणि ICICI बँक यांसारख्या भागीदार बँकांकडून केलेल्या EMI व्यवहारांवर अतिरिक्त ऑफर देखील देत आहे. या ऑफर 16 ऑक्टोबरपर्यंत लाइव्ह असल्याचे वेबसाइटने जाहीर केले आहे.

स्मार्टवॉच तसेच इअरबड्सवर अनेक ऑफर

Apple Watch SE: Apple Watch SE हे फ्लॅगशिप वॉच सिरीज 8 पेक्षा तुलनेने अधिक परवडणारे आहे. हे रेटिना डिस्प्ले, iPhones कनेक्टिव्हिटी, अॅक्टिव्हीटी, हेल्थ आणि सेफ्टी सेन्सरसह येते. वॉच एसई 64-बिट ड्युअल कोर S5 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तुम्ही 27,900 रुपयांमध्ये ही खरेदी करू शकता.

Noise Pulse Go Buzz Smart Watch: नॉईज पल्स गो बझ स्मार्टवॉच स्मार्ट कॉल आणि अडव्हांस ब्लूटूथ टेक नावाच्या फीचर्ससह येते. या स्मार्टवॉचला 1.69-इंचाचा डिस्प्ले, नॉइज हेल्थ सूट, 150 पेक्षा जास्त वॉचफेसेस, ऑटो डिटेक्शनसह 100 स्पोर्ट्स मोड आणि IP68 वॉटर रेझिस्टन्स ही फीचर्स मिळतात. खरेदीदारांना 1,699 रुपयांच्या किमतीत स्मार्टवॉच विकत घेता येईल.

boAt Wave Lite स्मार्टवॉच: boAt Wave Lite स्मार्टवॉच 500 nits च्या ब्राइटनेससह 1.69-इंचाच्या HD फुल टच डिस्प्लेसह येते. हे स्मार्टवॉच डेली अॅक्टिव्हीटी ट्रॅकरसह बर्न झालेल्या कॅलरी, स्टेप्स आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या फीचर्सनी सुसज्ज आहे. खरेदीदारांना हे स्मार्टवॉच 1,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येईल.

boAt Airdopes 121v2: बोटचे Airdopes 121v2 हे एअरबड्स प्रत्येक चार्जसह 3.5 तासांपर्यंत प्लेबॅक आणि चार्जिंग केससह अतिरिक्त 10.5 तासांचा प्लेटाइम देण्याचा दावा करतात. इयरबडला ड्युअल टोन फिनिश देण्यात आला असून बडचे वजन प्रति इअरबड सुमारे 4g असते. त्याला 8mm ड्रायव्हर्स मिळतात. खरेदीदार 999 रुपयांना इअरबड खरेदी करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT