Fitness Apps Sakal
विज्ञान-तंत्र

Fitness Apps: जिमला जायचा कंटाळा येतो? 'हे' लोकप्रिय अ‍ॅप्स डाउनलोड करून घरीच करा व्यायाम

अनेकांना जिमला जाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या अ‍ॅप्सच्या मदतीने घरीच व्यायाम करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

best Fitness Apps: गेल्या काही वर्षात लोकं आरोग्याबाबत जागृक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शारिरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याबाबत देखील लोकांमध्ये जागृकता दिसून येते. भारतातील अनेकजण लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब अशा समस्यांनी ग्रस्त आहेत. अशावेळी व्यायाम करणे फायद्याचे ठरते.

अनेकांना जिमला जाण्याचा कंटाळा येतो. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी असाल तर प्ले स्टोरवर अनेक चांगले अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच व्यायाम करू शकता. अशाच काही शानदार फिटनेस अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

नींद (Neend)

Neend हे एक रिलॅक्स, स्लीप आणि मेडिटेशन अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या संस्थापक सुरभी जैन या आहेत. कोव्हिडच्या काळात झोप येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. या अ‍ॅपमध्ये गोष्टी, स्मूथ स्लीप साउंड, मेडिटेशन स्थानिक भाषेत उपलब्ध आहेत. याच्या मदतीने सहज झोप लागेल. या अ‍ॅपला हजारो लोकांनी डाउनलोड केले आहे.

हेही वाचा: Auto Expo 2023: इलेक्ट्रिक कार्स मार्केट गाजवणार, बाजारात येणार 'या' ५ भन्नाट EV

BunkerFit-Strong Body & Mind

BunkerFit-Strong Body & Mind अ‍ॅप खास कर्मचाऱ्यांसाठी आहे. कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्टिव्ह लाइफस्टाइल लक्षात घेऊन या अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे. यामध्ये ट्रेनिंग वर्कआउट, योगा वर्कआउट, स्लीप मॉड्यूल, ब्रीदिंग एक्सरसाइज सारख्या अ‍ॅक्टिव्हिटी मिळतील. गुगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध असलेल्या या अ‍ॅपला लाखो यूजर्सने डाउनलोड केले आहे.

Dance Workout for Weight Loss

या अ‍ॅपच्या मदतीने डान्स, एअरोबिक डान्स वर्कआउट, बेली डान्स शिकता येईल. याशिवाय, डान्स शिकताना तुमचे वजन देखील कमी होईल. गुगल प्ले स्टोरवर या अ‍ॅपला ४.१ रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : उसाला ४,५०० रुपये पहिली उचल मिळण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सातारा येथे महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT