Website Sakal
विज्ञान-तंत्र

Government Sites: शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत... खूपच उपयोगी येतील 'या' ३ सरकारी वेबसाइट्स

सरकारने विद्यार्थ्यांसाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध केल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला शिक्षण व नोकरीसाठी मदत होईल. या साइट्स मोफत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Best Government Websites: सरकार तरुणांना शिक्षण व नोकरीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध व्हावेत, यासाठी सातत्याने नवनवीन योजना आणत असते. डिजिटल माध्यमातून तरुणांना नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत व्हावी, यासाठी सरकारचा प्रयत्न असतो.

अशा अनेक वेबसाइट सरकारने सुरू केल्या आहेत, ज्याचा उपयोग तरुणांना शिक्षण व रोजगारासाठी होऊ शकतो. या साइटच्या माध्यमातून मोफत स्टडी मटेरियल, मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुविधा आणि नोकरी शोधण्यास मदत होईल. या वेबसाइट्सविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Swayam.gov.in

ज्या लोकांना स्वतः काहीतरी नवीन शिकायचे आहे, त्यांना ही वेबसाउट उपयोगी येईल. यावर वेगवेगळे स्टडी मटेरियल मोफत उपलब्ध आहे. तुम्ही हा अभ्यास पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करू शकता. तुम्हाला एखादे टेक्निकल काम शिकायचे असल्यास येथे काही सॉफ्टवेअर देखील मिळतील. ही वेबसाइट पूर्णपणे मोफत आहे. साइटवर अनेक पुस्तके देखील मोफत उपलब्ध आहेत.

aicte.internship-india.org

कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थी कमाईचे देखील मार्ग शोधत असतात. तुम्ही देखील पार्ट टाइम नोकरी अथवा इंटर्नशिपच्या शोधात असाल, तर या वेबसाइटचा उपयोग होईल. गुगल सारख्या मोठ्या कंपनीत इंटर्नशिप करायची असल्यास या वेबसाइटची मदत घेऊ शकता. इंटर्नशिपनंतर तुम्ही या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज देखील करू शकता. ही एक सरकारी वेबसाइट आहे.

ncs.gov.in

अनेकजण असे असतात ज्यांचे शिक्षण तर झाले असते पण नोकरी नसते. पदवी, पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतरही नोकरी नसल्यास या वेबसाइटची मदत घेऊ शकता. या वेबसाइटवर तुम्ही शिक्षणाच्या आधारावर सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला नोकरी हवी असल्यास या वेबसाइटचा उपयोग होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT