BGMI Account restore Esakal
विज्ञान-तंत्र

Battlegrounds Mobile India : भारतात परत आली BGMI गेम; असं परत मिळवा तुमचं जुनं अकाउंट आणि डेटा

तुमचं जुनं अकाउंट आणि त्यामधील डेटा तुम्हाला पुन्हा अ‍ॅक्सेस करता येणार आहे.

Sudesh

ऑनलाईन मल्टिप्लेअर गेम BGMI आता भारतात परत आली आहे. सुमारे वर्षभरानंतर ही गेम परतल्यामुळे गेमर्स पुन्हा उत्साहात आहेत. मात्र, आता ही गेम पुन्हा पहिल्यापासून सुरू करावी लागणार का? असा प्रश्नही कित्येक गेमर्सना पडला आहे. मात्र, तुम्ही तुमचं जुनं अकाउंट परत मिळवू शकता अशी माहिती क्राफ्टॉनने दिली आहे.

क्राफ्टॉन या कंपनीने तयार केलेली बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया ही मल्टिप्लेअर बॅटल रॉयल प्रकारातील गेम आहे. या गेमचे भारतात अनेक फॅन्स आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या वर्षी या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता सरकारने ९० दिवसांसाठी ही गेम पुन्हा लाँच करण्यास परवानगी दिली आहे.

अशी करा डाऊनलोड

अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही मोबाईलमध्ये ही गेम डाऊनलोड करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमधून तुम्ही ही गेम डाऊनलोड करू शकता. अँड्रॉईड व्हर्जनच्या गेमची साईज सुमारे ७५१ एमबी आहे. यानंतर काही अ‍ॅडिशनल फाईल्सही तुम्हाला डाऊनलोड कराव्या लागतील, ज्यामुळे गेमची साईज वाढणार आहे. या गेमचे २.५ व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ही गेम खेळता येणार आहे.

असं मिळवा जुनं अकाउंट

गेम बॅन होण्यापूर्वी जर तुम्ही ती खेळत होता, तर तुमचं जुनं अकाउंट आणि त्यामधील डेटा तुम्हाला पुन्हा अ‍ॅक्सेस करता येणार आहे. तुम्ही जुनं अकाउंट जर एखाद्या सोशल मीडिया साईटला लिंक केलं होतं, तर तुमच्यासाठी ही प्रक्रिया अगदी सोपी असणार आहे. तुम्हाला केवळ लॉग-इन करताना आपल्या सोशल मीडिया हँडलचे क्रेडेन्शिअल्स टाकून लॉग-इन करायचं आहे. यामुळे तुमचं जुनं अकाउंट पुन्हा सुरू होईल, आणि तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागणार नाही.

गेस्टना नाही मिळणार डेटा

गेम बॅन होण्यापूर्वी जर तुम्ही गेस्ट यूजर म्हणून खेळत होता, तर मात्र तुमचा डेटा परत मिळणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागेल.

दरम्यान, सरकारने क्राफ्टॉनला केवळ ९० दिवस ही गेम लाँच करण्याची परवानगी दिली आहे. या ९० दिवसांमध्ये कंपनीला सरकारच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करावे लागेल. तीन महिने देखरेख केल्यानंतर पुढे ही गेम सुरू ठेवायची की नाही याबाबत सरकार निर्णय घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT