BGMI Sanhok eSakal
विज्ञान-तंत्र

BGMI Sanhok : प्रो गेमर व्हायचं असेल, तर मिस करू नका 'हे' टॉप लँडिंग स्पॉट्स.. जाणून घ्या

Sanhok Landing Spot : सॅनहॉकमध्ये लँडिंग करण्यासाठी टॉप पाच स्पॉट असे आहेत, जिथे उतरल्यानंतर तुम्ही अगदी आरामात ही गेम खेळू शकाल.

Sudesh

BGMI Best Landing Spots in Sanhok : बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया ही एक लोकप्रिय गेम आहे. भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असणाऱ्या या गेमला क्राफ्टॉन कंपनीने बनवलं आहे. या गेममध्ये वळोवेळी नवीन अपडेट्स देण्यात येतात. तसंच यामध्ये प्लेयर्सना खेळण्यासाठी विविध प्रकारचे मॅप्स देखील दिले आहेत. यातील सॅनहॉक (Sanhok) हा मॅप गेमर्सना अधिक पसंत पडतो आहे.

सॅनहॉकमध्ये लँडिंग करण्यासाठी टॉप पाच स्पॉट असे आहेत, जिथे उतरल्यानंतर तुम्ही अगदी आरामात ही गेम खेळू शकाल. यामुळे तुम्ही कमी कालावधीमध्ये प्रो गेमर होऊ शकता. या लोकेशन्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

डॉक्स

सॅनहॉक मॅपमध्ये उजव्या बाजूला खाली Docks ही लोकेशन आहे. खूप कमी प्लेयर्स ही लोकेशन वापरतात. मात्र, याठिकाणी जास्त मेहनत न करता अधिक प्रमाणात लूट मिळू शकते. कमी गर्दी असली तरीही याठिकाणी भरपूर लूट उपलब्ध आहे.

रुइन्स

मॅपमध्ये डाव्या बाजूला खाली असणारी Ruins ही लोकेशन जणू एक खजानाच आहे. याठिकाणी पुरातन मंदिरांचे अवशेष आणि भुयारे आहेत. याठिकाणी प्लेयर्सना लपण्यासाठी सुरक्षित जागाही मिळतात.

पै नान

Pai Nan ही लोकेशन सॅनहॉक मॅपमध्ये अगदी सेंटरला आहे. याठिकाणी एक छोटंसं गाव आहे जिथे लुटीसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. हे गाव छोटं असलं तरी कित्येक प्लेयर्स इथे उतरण्यासाठी पसंती दर्शवतात.

याव्यतिरिक्त पॅराडाईज रिसॉर्ट (Paradise Resort) आणि बूटकॅम्प (Bootcamp) हे लोकेशन्स देखील गेमर्ससाठी चांगले आहेत. हे लोकेशन तितके लोकप्रिय नसले, तरी चिकन डिनर करण्यासाठी अगदी परफेक्ट समजले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT