Big solar storm Sakal
विज्ञान-तंत्र

Solar Storm: भयंकर सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने; जाणून घ्या काय होणार परिणाम

Solar Storm: शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, दोन दशकांत प्रथमच सौर वादळ पृथ्वीवर धडकणार आहे. याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Solar Storm: सुर्याकडून येणारी एक लहर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, दोन दशकांत प्रथमच सौर वादळ पृथ्वीवर धडकणार आहे. अमेरिकेची वैज्ञानिक एजन्सी नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने एक चेतावणी दिली आहे की, सौर वादळामुळे उपग्रहांना आव्हान निर्माण होऊ शकते. याशिवाय पॉवर ग्रीड निकामी होण्याचा धोका, दळणवळण नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊ शकतात.

अमेरिकन संस्थेने सांगितले की, हे सौर वादळ आठवड्याच्या शेवटी पृथ्वीवर धडकेल. 2005 नंतरचे हे पहिले सौर वादळ आहे. यामुळे जगभरातील ब्लॅकआउट, उच्च वारंवारता रेडिओ लहरींचा धोका निर्माण झाला आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ट्रान्स ध्रुवीय भागात उडणाऱ्या विमानांबाबत अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. हे री-रूट केले जाऊ शकतात. तस्मानियापासून ब्रिटनपर्यंतच्या आकाशात ही चमक दिसेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की हे तीव्र श्रेणीचे (G4) भूचुंबकीय वादळ आहे. याआधी 2005 मध्ये हेलोवीन सौर वादळ आले होते तेव्हा स्वीडनमध्ये ब्लॅकआउट झाले होते. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेतील वीज पायाभूत सुविधांवरही परिणाम झाला.

खरं तर, सौर वादळाच्या टक्करमुळे, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल दिसून येतात, ज्यामुळे ऊर्जा प्रकल्प आणि नेव्हिगेशन सिस्टमवर परिणाम होतो. अहवालानुसार, तस्मानिया आणि युरोपमधील अनेक भागातील लोकांनी थेट डोळ्यांनी या सौर वादळाची झलक पाहिली आहे.

सौर वादळे कोरोनल मास इंजेक्शनमुळे तयार होतात. जी सूर्यावर होणाऱ्या स्फोटक घटना आहेत. जिथे सूर्याकडून येणारा प्रकाश पृथ्वीवर अवघ्या 8 मिनिटात पोहोचतो. तर CME लाटा 800 किमी प्रति सेकंदाच्या वेगाने फिरतात.

कोणते आव्हान येऊ शकतात

शास्त्रज्ञांच्या मते, सौर वादळामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतो. यामुळे वीज लाईनमध्ये अतिरिक्त प्रवाह येऊ शकतो आणि एखाद्याला ब्लॅकआउटला सामोरे जावे लागू शकते. याशिवाय लांबलचक पाइपलाइनमधूनही वीज वाहू शकते, त्यामुळे मशिन खराब होण्याचा धोका आहे.

याशिवाय अंतराळयान आपला मार्ग गमावू शकतो. नासाने आपल्या अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी एक टीम तयार केली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की लोकांनी लाईट गेल्यावर प्रकाशासाठी टॉर्च, दिवा, मेणबत्ती यासारख्या गोष्टीं जवळ ठेवाव्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Latest Marathi News Updates : आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

Whatsapp Threaded Reply : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एका भन्नाट फीचरची एन्ट्री! हे नेमकं कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरण विसर्ग सध्या १४ हजार ५४७ क्यूसेक; २० हजार क्युसेक होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT