Bike Milegae Tips Sakal
विज्ञान-तंत्र

Bike Mileage Tips: बाईकचा मायलेज वाढवण्यासाठी करा 'या' गोष्टी, लगेच दिसेल फरक

Bike Mileage Tips: बाईकचा मायलेज वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Bike Mileage Tips increase bike mileage step by step

रोजच्या प्रवासासाठी बाईक हा एक उत्तम पर्याय आहे. पण इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोकांना मायलेजची चिंता अधिक असते. बाईकचा मायलेज वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.

  • रिट्यून कार्बोरेटर

बाईकचा मायलेज वाढवण्यासाठी कार्बोरेटर रिट्यूनिंग करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या बाईकमधून जास्तीत जास्त मायलेज मिळत नसेल, तर कार्बोरेटर सेटिंग्ज तपासावे. इलेक्ट्रिकली किंवा मॅन्युअली रिट्यून करता येते. असे केल्याने इंजिनची कार्यक्षमता वाढेल आणि मायलेजमध्येही लक्षणीय बदल दिसेल.

  • ट्रॅफिक सिग्नलवर बाईक बंद करावी

तुम्हाला ट्रॅफिक सिग्नलवर 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असेल तर बाईक इंजिन बंद करावी. बाईक चालू असेल तर इंधन खर्च होते. त्यामुळे, ट्रॅफिक सिग्नलवर जिथे तुम्हाला बराच वेळ थांबावे लागते, तिथे तुम्ही इंजिन बंद करून इंधनाचा बचत कर शकता.

  • मॉडिफिकेशन टाळा

अनेक लोकांना बाईकचे मॉडिफिकेशन करायला आवडते. जेव्हा तुम्ही त्यात अनावश्यक अपडेट्स आणि बदल करता तेव्हा त्याचा थेट परिणाम इंजिनवर होतो. त्यामुळे बाईकची इंधन कार्यक्षमताही कमी होते.

  • टायरचे प्रेशर तपासावे

कोणत्याही वाहनाची इंधन कार्यक्षमता टायरच्या दाबावरही खूप अवलंबून असते. जेव्हा तुम्ही बाईकने लांबचा प्रवास करता तेव्हा पेट्रोल पंपावर टायरचा दाब तपासा आणि त्याची नियमित देखभाल करा.

  • बाईकची स्वच्छता

बाईक स्वच्छ ठेवल्यास मायलेज वाढण्यास मदत मिळते. बाईक वेळोवेळी धुवा आणि स्वच्छ ठेवा. तसेच बाईकच्या पार्टमध्ये योग्यवेळी ऑईल टाकावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT