Bill Gates Wrist Watch eSakal
विज्ञान-तंत्र

Bill Gates Wrist Watch : बिल गेट्स कोणतं घड्याळ वापरतात? किंमत ऐकून व्हाल थक्क.. जाणून घ्या

Casio Watch : बिल गेट्स यांच्या घड्याळात 200M वॉटर रझिस्टंस, वन-वे रोटेटिंग बेझल, स्क्रू-डाऊन क्राऊन, मिनरल ग्लास, डेट डिस्प्ले असे फीचर्स मिळतात.

Sudesh

Bill Gates Watch Price : जगभरातील कित्येक लोकांना महागडी घड्याळं घालण्याची आवड असते. त्यातच सेलिब्रिटी कोणतं घड्याळ वापरतात हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील सर्वांना असते. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी यांच्या घड्याळाची चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स कोणतं घड्याळ वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का?

अब्जाधीश असल्यामुळे बिल गेट्स देखील अगदी कोट्यवधी किंमतीचं महागडं घड्याळ वापरतात असं जर तुम्हाला वाटत असेल; तर तुम्ही सपशेल चुकलाय. कारण बिल गेट्स हे आजही अगदी साधं असं कॅसिओ घड्याळ वापरतात.

कॅसिओ कंपनीचं घड्याळ

बिल गेट्स हे Casio MDV-106 Duro हे घड्याळ वापरतात. कित्येक वेळा त्यांनी हे घड्याळ घातलेलं पाहण्यात आलं आहे. बिल गेट्सकडे या घड्याळाचं अगदी जुनं मॉडेल आहे, ज्यावर मर्लिन माशाचा लोगो आहे. कंपनीने हा लोगो वापरणं आता बंद केलं आहे.

Casio Wrist Watch

किती आहे किंमत?

कॅसिओच्या MDV-106 Duro या घड्याळाची किंमत अमेझॉनवर 11,337 रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हे घड्याळ अवघ्या आठ ते दहा हजार रुपयांना खरेदी करू शकता.

ही एक एनालॉग वॉच आहे. यामध्ये 200M वॉटर रझिस्टंस, वन-वे रोटेटिंग बेझल, स्क्रू-डाऊन क्राऊन, मिनरल ग्लास, डेट डिस्प्ले असे फीचर्स मिळतात.

असामान्यांच्या सामान्य गोष्टी

केवळ बिल गेट्सच नव्हे, तर अ‍ॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स देखील साधंच घड्याळ वापरत होते. ते नेहमी 33mm Seiko हे घड्याळ वापरत. तर फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग देखील अगदी साध्या प्रकारच्या कपड्यांमध्ये दिसून येतात. दैनंदिन वापरासाठी ते एकाच रंगाचा टी-शर्ट वापरतात. केवळ ठराविक कार्यक्रमांनाच ते सूट किंवा इतर कपड्यांमध्ये दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election Maharashtra : AB फॉर्मवरून रुसवे-फुगवे, मारामारी…; चांद्यापासून बांद्यापर्यंत नगरसेवक होण्यासाठी राडा नाट्य, ९ जिल्ह्यात राजकीय रणकंदन

Latest Marathi News Live Update : वर्सोवा प्रभाग क्रमांक ५९ मध्ये ठाकरे गटात बंडखोरी उघड

Sangli Election : महापालिका निवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय; लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाही

Insurance Fraud Case : धक्कादायक प्रकार! 3 कोटींच्या विम्यासाठी मुलांनीच रचला वडिलांच्या हत्येचा कट; रात्री झोपेत असताना साप अंगावर सोडून...

तुरुंगात असलेल्या आदेंकरांच्या घरातील दोघींना राष्ट्रवादीची उमेदवारी, अजितदादांनी दिले एबी फॉर्म

SCROLL FOR NEXT