Birth control pill for men  Sakal
विज्ञान-तंत्र

आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी होणार मानवी चाचणी

पुरुषांसाठी कुटूंबनियोजन औषध तयार करण्याच्या दिशेन संशोधकांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

कुटूंबनियोजनासाठी गर्भनिरोधक गोळ्या हा एक सर्वपरिचित पर्याय आहे. परंतु आता पुरुषांसाठीही कुटूंबनियोजन गोळ्या तयार करण्याच्या दिशेन संशोधकांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. मिनेसोटा विद्यापीठातील संशोधकांनी तयार केलेल्या कुटूंबनियोजन गोळ्यांची उंदरांवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. या चाचणीत उंदरांमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी या गोळ्या 99% प्रभावी ठरल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या औषधांचे स्पष्ट दुष्परिणाम नाहीत. (Birth control pill for men expected to start human trials)

उंदिरावर GPHR-529 ह्या संयुगाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर चार आठवड्यातच शुक्राणूंच प्रमाण घटल्याची नोंद शास्त्रज्ञांनी केलीय. आश्चर्य म्हणजे जेव्हा या GPHR-529 या संयुगाचा(औषधाचा) डोस देणे थांबविल्यानंतर पुढील सहा आठवड्यातचं शुक्राणूंची संख्या पुर्ववत झालीय.

या गर्भनिरोधक गोळ्यांवरील संशोधन मोहम्मद अल् -नोमान हामपीएचडीचा विद्यार्थी करत आहे.त्याच्या नेतृत्वाखाली पुरुषांच्या कुटूंबनियोजन औषधाचं संशोधन सुरु आहे. अनेक वर्षांपासून ते पुरुष गर्भनिरोधकांवर अभ्यास करत आहे. मिनेसोटा विद्यापीठ काही काळापासून पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांचा शोध घेत आहे.

महीलांवर नेहमीच गर्भनिरोधकासाठीचा जबाबदारी असते. गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर टी ह्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कॉपर टी हे उपकरण तर थेट महीलांच्या गर्भाशयातच बसविण्यात येत. त्यामुळे महीलांना मोठ्या वेदना होतात. पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आल्यास महीलांवरील कुटुंबनियोजनाची जबाबदारी नक्कीच कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT