Blabla Car App Pune esakal
विज्ञान-तंत्र

Blabla Car App वापरताय? सावधान! गुप्त प्रवासी बनून वायुवेग पथक करणार कारवाई, पुण्यात ७ जागी होणार तपासणी; काय आहेत नियम?

Pune Blabla Car App : पुणेतील परिवहन विभागाने ब्लाब्ला कार आणि तत्सम अ‍ॅप्सवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. खाजगी वाहनांचा व्यावसायिक वापर थांबवण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे.

Saisimran Ghashi

BlaBla Car Fraud : मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकप्रिय ठरलेल्या ब्लाब्ला कार (BlaBlaCar) अ‍ॅपवर आता परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कार पूलिंग करून प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा दिली जात होती. मात्र, परिवहन विभागाने ब्लाब्ला कारसारख्या अ‍ॅप्सवर "अनधिकृत प्रवासी वाहतूक" केल्याचा आरोप करत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू

परिवहन विभागाच्या आदेशानुसार, ब्लाब्ला कारसारख्या (BlaBlaCar Pune) अ‍ॅप्सद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांची तपासणी आणि कारवाई करण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत नवले ब्रिज, चांदणी चौक, स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, येरवडा, आणि नगर रोड येथे तपासणी केली जाईल.

तपासणी पथकांना गुप्त प्रवासी बनून अ‍ॅपद्वारे बुकिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, वाहन चालक व प्रवाशांची संपूर्ण माहिती गोळा करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास वाहने जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

प्रवाशांचे संतप्त टीकास्त्र

ब्लाब्ला कारवर झालेल्या या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक प्रवाशांनी हा निर्णय प्रवाशांच्या सुविधांवर घाला असल्याचे म्हटले आहे. "खाजगी वाहतूक व्यवसायिकांशी संधान बांधण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे," असा आरोप प्रवाशांनी केला आहे. (BlaBlaCar News Pune)

एक प्रवासी म्हणाले, “ब्लाब्ला कारमुळे वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होत होती. शिवाय, एकट्याने प्रवास करण्यापेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कार पूलिंग फायदेशीर ठरते. मात्र, परिवहन विभागाच्या निर्णयामुळे आता प्रवाशांची गैरसोय होणार आहे.”

ब्लाब्ला कारसारख्या अ‍ॅप्सच्या वापरामुळे इंधनाचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळत होती. मात्र, परिवहन विभागाने अशा सेवा थांबवण्याचा प्रयत्न करून प्रवाशांच्या हिताला धोका पोहोचवल्याचा आरोप होत आहे.

प्रवाशांचा सवाल कायद्याचा गैरवापर?

परिवहन विभागाने केलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही प्रवाशांनी, “खाजगी वाहनांवर व्यावसायिक वाहतूक केल्याचा आरोप करण्याऐवजी, सरकारने या सुविधांना अधिकृत मान्यता द्यावी. अशा सुविधांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर व स्वस्त होतो,” अशी मागणी केली आहे. (BlaBlaCar Pune)

परिवहन विभागाचे स्पष्टीकरण

परिवहन विभागाने या मोहिमेचे समर्थन करताना म्हटले आहे की, “ब्लाब्ला कार आणि तत्सम अ‍ॅप्सद्वारे खाजगी वाहने व्यावसायिक हेतूंसाठी वापरणे नियमबाह्य आहे. अशा सेवांमुळे परवाना असलेल्या वाहतूकदारांवर अन्याय होतो. कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.”

ब्लाब्ला कारसारख्या अ‍ॅप्सवर चालू असलेल्या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुविधांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय, सरकारने या अ‍ॅप्ससाठी ठोस धोरण तयार करणे आणि प्रवाशांच्या सोयींसाठी सकारात्मक तोडगा काढणे गरजेचे आहे, असा सूर आता उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Employee Property : ४४ भूखंड, किलोभर सोने, कोटींचा बँक बॅलन्स अन्... कर्मचाऱ्याची ‘सोनेरी’ कमाई पाहून तपास यंत्रणाही हादरली !

Delhi : दिल्लीत सुरक्षा रामभरोसे! चोरट्यांनी महिला खासदाराची सोन्याची चेन हिसकावली, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला शनि अन् मंगळाचे असे दुर्मिळ योग, 3 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षाव

ENG vs IND,5th Test: खांदा निखळला असतानाही इंग्लंडचा खेळाडू फलंदाजीला उतरणार? Video होतोय व्हायरल; जो रुट म्हणाला...

Kharadi IT Hub : खराडी आयटी हबमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता; व्यावसायिकांना टोळक्यांची दहशत

SCROLL FOR NEXT