Brazil, Ernesto Galiotto, IPhone, phone falls from plane,iral Video 
विज्ञान-तंत्र

गोष्ट 984 फूट उंच उडणाऱ्या विमानातून खाली पडलेल्या iPhone ची (व्हिडिओ)

सकाळ ऑनलाईन

ब्राझील (Brazil) मधील डॉक्यूमेंट्री निर्माता अर्नेस्टो गालियोट्टो (Ernesto Galiotto) अशी एक गोष्ट केली आहे की ती कदाचित स्वप्नवत वाटावी. त्यांचा स्वत:चा आयफोन उंच भरारी घेतलेल्या प्लेनमधून चक्क खाली पडला. विशेष म्हणजे खूप उंचावरुन पडून देखील त्यांच्या फोनला काहीच झाले नाही. एवढेच नव्हे तर या कॅमेऱ्यात प्लेनमधून जमीनीवर पडेपर्यंतच्या प्रवास वर्णनाचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड झाला आहे. 

दिग्दर्शक शुक्रवारी रिओ डी जेनेरोच्या कबाना समुद्र किनाऱ्यावरुन त्यांचे विमान उड्डान करत होते. जेव्हा त्यांनी आपला iPhone 6S खासगी विमानाच्या खिडकीबाहेर ठेवला त्यावेळी हवेच्या वेगामुळे तो त्यांच्या हातून निसटला. फोन पडल्यानंतर तुमच्या आमच्या मनात जो विचार आला तोच विचार त्यांच्या मनातही आला. आता फोन विसरायलाच हवे, असे त्यांनाही वाटले. पण कुणालाही विश्वास बसणार नाही, असे घडले. 

त्यांनी ज्यावेळी GPS च्या माध्यमातून आपला फोन ट्रॅक केला तेव्हा फोन समुद्र किनारपट्टीवर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते फोनची काय अवस्था झाली असेल हा विचार करुन फोनपर्यंत पोहचले आणि त्यांना जवळपास 300 मीटर (984 फूट) उंचीवर पडलेला फोन सुस्थितीत सापडला. फोनचे स्क्रीन प्रोटेक्टेर आणि कव्हरला थोडेफार नुकसान झाले होते. फोनच्या इनबिल्ट कॅमेऱ्यात 15 सेकंदाचा व्हिडिओही कैद झाल्याचे निदर्शनास आले. दिग्दर्शकाने  युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करुन त्यांनी फोनची अविश्वसनीय कहाणी शेअर केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT