bsnl plan 
विज्ञान-तंत्र

BSNL चा 400 रुपयांचा प्लॅन, मिळेल 600GB डेटा आणि इतर बेनिफिट्स

सकाळ डिजिटल टीम

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी अलीकडेच त्यांच्या टॅरिफ प्लॅन दरांमध्ये वाढ केली आहे. त्यातच BSNL ने आपले अनेक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत, जे BSNL प्रतिस्पर्धी Jio, Airtel आणि Vodafone Idea या खाजगी कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत आणि जास्त बेनिफिट्स ऑफर करतात. आज आपण BSNL च्या अशाच 397 रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, फ्री एसएमएस, 600GB डेटा यासह अनेक फायदे मिळतात.

बीएसएनएलचा 397 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये कॉलिंग आणि इतर सेवांची वैधता 60 दिवसांची आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला दररोज 2GB हाय स्पीड (2G/3G/4G) डेटाचा लाभ मिळेल. तसेच या प्लॅनची ​​एकूण वैधता 300 दिवस आहे. म्हणजेच, युजरला 60 दिवसांसाठी सर्व फायदे मिळतील, तर युजरला पुढील 240 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये PRBT (रिंग बॅक टोन किंवा कॉलर ट्यून) सुविधा उपलब्ध आहे. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वापरकर्त्याला या प्लॅनमध्ये 80Kbps च्या वेगाने अनलिमीटेड डेटा मिळत राहील.

Airtel, Jio, Vi ला टक्कर देणार

BSNL चा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनशी थेट स्पर्धा करत आहे , दरम्यान एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन, जिओचा 419 रुपयांचा नवीन प्लॅन आणि Vodafone-Idea चा 409 रुपयांचा नवीन प्लॅन BSNL च्या या प्लॅनच्या स्पर्धेत आहे. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनमध्ये जास्त डेटा उपलब्ध नाही किंवा जास्त वैधताही उपलब्ध नाही. चला, जाणून घेऊया इतर कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल.

Airtel आणि Vodafone-idea च्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या दोन्ही कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन सारखे आहेत. यामध्ये यूजरला दररोज 2.5GB हायस्पीड डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस यांसारख्या ऑफर्स मिळणार आहेत.तसेच Vodafone-idea त्‍याच्‍या प्‍लॅनमध्‍ये युजरच्‍या रात्री आणि वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देते. तर, Airtel वापरकर्त्यांना FastTAG सह इतर अनेक फायदे मिळतात.

रिलायन्स जिओच्या 419 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे तर, या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला दररोज 3GB डेटाचा लाभ मिळतो आणि प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे. यामध्ये यूजरला Airtel आणि Vodafone-idea सारखी कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळेल. तसेच, वापरकर्त्याला या प्लॅनमध्ये Jio च्या अनेक मोफत अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT