BSNL Only Calling SMS Recharge Plan esakal
विज्ञान-तंत्र

BSNL Recharge Plan : BSNL ने वाढवलं जिओ, एअरटेलचं टेन्शन! आणला अनलिमिटेड कॉलिंग-SMS रिचार्ज प्लॅन; येणार फुल रेंज, किंमत फक्त...

BSNL Only Calling SMS Recharge Plan : बीएसएनएलने रु 439 च्या रिचार्ज प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता दिली आहे, ज्यात अनलिमिटेड कॉलिंग, मोफत SMS आणि राष्ट्रीय रोमिंग आहे. ही योजना कमी किमतीत जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला चांगला प्रतिस्पर्धा देत आहे.

Saisimran Ghashi

BSNL Recharge Plan : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक स्वस्त आणि दमदार रिचार्ज प्लान सादर केला आहे. हा प्लान विशेषतः डेटाशिवाय आहे, त्यामुळे ज्या ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि SMS सुविधांची गरज आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरणार आहे.

439 रुपयांचा BSNL प्रीपेड प्लान काय आहे खास?

BSNL 439 रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना मिळणार-

  • अनलिमिटेड कॉलिंग – भारतभर कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग

  • दररोज 300 SMS मोफत

  • फ्री नॅशनल रोमिंग – दिल्ली आणि मुंबईसह MTNL क्षेत्रांतही लागू

  • एकूण 90 दिवसांची वैधता

याचा अर्थ, दिवसाला फक्त 4 रुपये 90 पैसे खर्च करून ग्राहकांना BSNL च्या सेवा वापरता येणार आहेत. मात्र, या प्लानमध्ये डेटा सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे इंटरनेटसाठी वेगळा रिचार्ज करावा लागेल.

Airtel, Jio, Vi रिचार्ज प्लॅन

BSNL ने आपल्या स्वस्त आणि लांब कालावधीसाठी असलेल्या प्लान्समुळे Airtel, Jio आणि Vodafone Idea (Vi) यांसारख्या खाजगी कंपन्यांना मोठी स्पर्धा दिली आहे. कमी किमतीत जास्त फायदे मिळाल्यामुळे बजेट फ्रेंडली प्लान शोधणाऱ्या ग्राहकांसाठी BSNL हा उत्तम पर्याय बनू शकतो.

▪ सरकारकडून 6,000 कोटींचे आर्थिक पॅकेज – BSNL आणि MTNL च्या नेटवर्क अपग्रेडसाठी केंद्र सरकारने मोठी मदत दिली आहे.

▪ 4G विस्तार आणि 5G टेस्टिंग सुरू – BSNL ने आतापर्यंत 65,000+ 4G टॉवर्स कार्यान्वित केले असून लवकरच हा आकडा 1 लाखांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.

▪ नवीन ग्राहक जोडण्यावर भर – स्वस्त आणि दीर्घकालीन प्लान्ससह BSNL आपल्या ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

काय आहेत ग्राहकांच्या अडचणी?

तरीसुद्धा, अनेक ग्राहक BSNL नेटवर्कच्या स्पीड, कॉल ड्रॉप समस्या आणि नेटवर्क स्थिरतेबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे BSNL ला गेल्या चार महिन्यांत 3 लाखाहून अधिक ग्राहक गमवावे लागले आहेत.

जर तुम्ही अधिक डेटा वापरत नसाल आणि फक्त कॉलिंग व SMS साठी प्लान शोधत असाल, तर BSNL चा 439 रुपयेचा 90-दिवसांचा प्लान तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. खाजगी कंपन्यांच्या महागड्या प्लान्सच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे.

तुमचा यावर काय विचार आहे? BSNL चा हा स्वस्त प्लान तुम्ही वापरणार का? कमेंटमध्ये कळवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसह उपनगरात मुसळधार! रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकलसेवा विस्कळीत; घराबाहेर पडू नका, BMCचं आवाहन

C. P. Radhakrishnan VP Candidate : उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचंच नाव का? यामागे भाजपची नेमकी रणनीती काय?

Asia Cup 2025: संजू सॅमसन, शुभमन गिल की यशस्वी जैस्वाल, टीम इंडियात कोणाला मिळणार संधी? अश्विन म्हणतो...

Latest Marathi News Live Updates : पुण्यातील बाबा भिडे पूल 20 दिवसांसाठी खुला

नासा-इस्रोच्या NISAR ने गाठला मोठा टप्पा; उपग्रहाची छत्री उघडली, पृथ्वीला स्कॅन करून देणार 'या' 3 समस्यांवर माहिती

SCROLL FOR NEXT