Check BSNL Prepaid Plan Offer 
विज्ञान-तंत्र

BSNL चे चार नवे स्वस्त प्रीपेड प्लॅन; अमर्यादित कॉलिंगसह मिळेल डेटा

सकाळ डिजिटल टीम

BSNL Prepaid Plans : भारतातील अनेक कंपन्यांनी त्यांचे प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत. या दरम्यान BSNL ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन प्लॅन लॉंच करत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. Jio, Airtel, Vi शी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने आता चार नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन 184 रुपयांपासून ते 347 रुपयांपर्यंत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनची ​​किंमत आणि फायदे.

184 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - यामध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. या प्लॅनसाठी 28 दिवसांची वैधता दिली जात आहे. दररोज 1 GB डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 80kbps होईल. यासह, Lystn पॉडकास्ट बेनिफिट्स देखील दिले जातील.

185 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा, दररोज 100 SMS आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा दिली आहे. यामध्येही दररोज डेटा संपल्यानंतर स्पीड 80kbps होईल. तसेच, 28 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेब अॅपवर बंडलिंग ऑफ चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सर्व्हिसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

186 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - या प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवस आहे. यामध्ये देखील युजर्सना 184 आणि 185 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध फायदे दिले जातील. यासोबतच बीएसएनएल ट्यून्स आणि हार्डी गेम्सचाही एक्सेस दिला जाईल. यामध्येही दररोज 1GB डेटा दिला जातो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. यामध्येही दररोजची डेटा लिमीट संपल्यानंतर स्पीड 80kbps होईल.

347 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - यामध्ये दररोज 2GB डेटा दिला जाईल. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस दिले जातील. त्याची वैधता 56 दिवस आहे. यासोबतच प्रोग्रेसिव्ह वेब अॅपवर बंडलिंग ऑफ चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेची सुविधाही दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT