BSNL BiTV how to use it esakal
विज्ञान-तंत्र

BiTV Recharge Plan : ना डिश, ना केबल! फक्त 99 रुपयात 'या' बड्या कंपनीने सुरू केला लाइव्ह टीव्हीचा रिचार्ज, 450+ चॅनेलचा घेता येणार आनंद

BSNL ने BiTV सेवा सुरू केली आहे ज्यामध्ये 450 पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स मोफत उपलब्ध आहेत. 99 रुपयांच्या मोबाइल प्लॅनवर सुद्धा ग्राहकांना BiTV पाहण्याची संधी मिळते.

Saisimran Ghashi

BiTV Channels : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त सुविधा आणली आहे. आता BSNL BiTV या नव्या सेवेद्वारे ग्राहकांना 450 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स अगदी मोफत पाहता येणार आहेत. भारतातील BSNL युजर्सना या सेवेचा लाभ घेता येणार आहे, आणि विशेष म्हणजे यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही.

काय आहे BSNL BiTV?

BiTV ही BSNL ची डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) सेवा आहे, ज्यामुळे युजर्सना टीव्ही चॅनेल्स, वेब सिरीज आणि सिनेमे पाहण्याची संधी मिळेल. यापूर्वी या सेवेच्या चाचणी दरम्यान 300+ चॅनेल्स मोफत देण्यात आले होते. आता हे फीचर सर्व BSNL सिमकार्ड युजर्ससाठी पूर्णतः उपलब्ध झाले आहे.

फक्त 99 मध्ये मोफत लाइव्ह टीव्ही

BSNL च्या अधिकृत X (पूर्वीचे Twitter) हँडलवर ही घोषणा करण्यात आली आहे की अगदी कमी किंमतीच्या प्लॅनवरही BiTV मोफत उपलब्ध आहे. म्हणजेच, फक्त 99 रुपयांच्या प्लॅनवरही ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता लाइव्ह टीव्ही पाहता येणार आहे.

कोणता प्लॅन तुमच्यासाठी योग्य?

▶ 99 रुपयांचा प्लॅन

वैधता: 17 दिवस

फायदे: भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग

▶ 439 रुपयांचा प्लॅन

वैधता: 90 दिवस

फायदे: अनलिमिटेड कॉलिंग + 300 मोफत SMS

BSNL युजर्ससाठी सुवर्णसंधी

BSNL ने OTT Play सह भागीदारी करत ही नवी सेवा सुरू केली आहे. यामुळे BSNL च्या कोणत्याही मोबाईल प्लानसोबत BiTV मोफत मिळणार आहे. वापरकर्त्यांना BiTV अ‍ॅप डाउनलोड करून आपल्या स्मार्टफोनवर सहजगत्या ही सेवा वापरता येईल.

जर तुम्ही BSNL युजर असाल, तर तुमच्या फोनवर आता मोफत टीव्ही आणि सिनेमे पाहण्याचा आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा? सचिनची होणारी सून आहे मुंबईतील बिझनेसमनची नात

Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

SCROLL FOR NEXT