BSNL Network Check : बीएसएनएलने ग्राहकांसाठी नवा ९० दिवसांचा प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे, ज्यामुळे सिम सक्रिय ठेवण्यासाठी फक्त २ रुपये रोज खर्च येणार आहे. हा प्लॅन २०२५ सालाच्या १ जानेवारीपासून लागू होणार असून, बीएसएनएलच्या पश्चिम बंगाल टेलिकॉम सर्कलने अधिकृत माहिती शेअर केली आहे. यासोबतच बीएसएनएलने देशभरातील प्रीपेड व पोस्टपेड ग्राहकांसाठी इतर प्लॅनही सादर केले आहेत.
ग्राहकांसाठी २०१ रुपयांचा हा नवा प्लॅन मोठा फायद्याचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ९० दिवसांची वैधता मिळते. यामध्ये ग्राहकांना ३०० मिनिटे कोणत्याही भारतीय नंबरवर कॉल करण्यासाठी मिळतात, ६ जीबी डेटा व ९९ फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. हा प्लॅन खास करून GP2 श्रेणीतील (सिमची वैधता ८ ते १६५ दिवसांपूर्वी संपलेली) ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
ओपनसिग्नल वेबसाइटवरून तुम्ही नेटवर्क चेक करू शकता.
सामान्य ग्राहकांसाठी ४११ रुपयांचा ९० दिवसांचा प्लॅन उपलब्ध आहे. यात भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल्स, फ्री नॅशनल रोमिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस मिळतात. अधिक फायदे मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन उत्तम आहे.
दुसरीकडे, जिओने ४९ रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे, जो एक दिवसासाठी वैध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित डेटा वापरण्याचा लाभ मिळतो. मात्र, २५ जीबीपर्यंतच उच्चगती डेटा वापरण्याची मर्यादा आहे. त्यानंतर इंटरनेट स्पीड ४० केबीपीएसवर कमी होतो.
जिओचा ४९ रुपयांचा प्लॅन आणि बीएसएनएलचा २०१ रुपयांचा प्लॅन बाजारात स्पर्धा निर्माण करू शकतात. एअरटेल, VI, आणि इतर कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले प्लॅन सुधारण्याची शक्यता आहे.
ग्राहकांसाठी नवनवीन पर्याय उपलब्ध होत असल्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडून मोबाइल सेवा अधिक फायदेशीर बनवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.