Budget 2024 Electric Vehicles eSakal
विज्ञान-तंत्र

Budget 2024 Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; उत्पादन अन् चार्जिंग स्टेशन वाढवणार!

सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ई-बसेसचं जाळं निर्माण करण्याचीही सीतारामन यांनी घोषणा केली. या नेटवर्कला पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझमच्या मदतीने चालना देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.

Sudesh

FM Nirmala Sitharaman on Electric Vehicles : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. यावेळी त्यांनी सरकारने यापूर्वी केलेल्या गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींची तरतूद केली आहे याची माहिती दिली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी त्यांनी दिलासादायक घोषणा केल्या आहेत.

भारतामध्ये ई-व्हेईकल इकोसिस्टीम वाढवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी भारतातच या वाहनांचं उत्पादन घेण्यास चालना देणे आणि मोठं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे याकडे सरकार लक्ष देणार आहे. सोबतच सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ई-बसेसचं जाळं निर्माण करण्याचीही सीतारामन यांनी घोषणा केली. या नेटवर्कला पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझमच्या मदतीने चालना देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, अर्थमंत्र्यांनी उत्पादन आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला असला; तरी वाहनांच्या सबसिडीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांवरील सबसिडी वाढणार अशी सर्वसामान्यांची आशा लोप पावली आहे.

नोकरीच्या नवीन संधी

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यामुळे सध्याचे व्हेंडर्स आणि या क्षेत्रात नवीन येणाऱ्यांना देखील संधी दिली जाईल. यामुळे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनवरील रोजगार देखील वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT