Dhanteras Digital Gold eSakal
विज्ञान-तंत्र

Digital Gold : या धनत्रयोदशीला खरेदी करा 'डिजिटल' सोनं; नवीन अ‍ॅप्स घेण्याचीही गरज नाही; जाणून घ्या कसं?

Dhanteras Gold Offers : आपल्याकडे धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे.

Sudesh

आपल्याकडे धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी देशभरातील सोनारांच्या दुकानांवर प्रचंड गर्दी पहायला मिळते. मात्र, यंदाच्या दिवाळीला सोन्याची खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनवरुनच तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकणार आहात.

विशेष म्हणजे डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन अ‍ॅप घेण्याची देखील गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असणाऱ्या यूपीआय अ‍ॅप्सच्या मदतीनेच तुम्ही सोनं खरेदी करू शकणार आहात.

पेटीएम

यूपीआय पेमेंटसाठी वापरलं जाणाऱ्या पेटीएम अ‍ॅपमधून तुम्ही 99.9% शुद्ध डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. MMTC-PAMP सोबत मिळून पेटीएम ही सेवा देतं. याठिकाणी तुम्ही 10 रुपयांपासून देखील सोनं खरेदी करू शकता. तसंच, हे सोनं तुम्ही अ‍ॅपमध्येच विकू देखील शकता.

गुगल-पे

गुगल-पे हे अ‍ॅपदेखील एमएमटीसी-पीएएमपी सोबत मिळून डिजिटल गोल्डची विक्री करतं. याठिकाणी तुम्ही 24 कॅरेट सोनं खरेदी करू शकता. हे सोनं एका डिजिटल लॉकरमध्ये सेव्ह राहतं. गरज भासल्यास तुम्ही अ‍ॅपमध्येच याची विक्री देखील करू शकता. (Tech News)

'फोन-पे'वर ऑफर्स

फोन-पे या यूपीआय पेमेंट अ‍ॅपवर देखील सोनं खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी MMTC-PAMP, सेफगोल्ड आणि Caratlane असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. हे सोनं तुम्ही अ‍ॅपमध्येच विकू देखील शकता. तसंच, याची फिजिकल डिलिव्हरी देखील तुम्ही घेऊ शकता. सध्या फोन-पेवर कॅशबॅक ऑफर देखील सुरू आहे.

या व्यतिरिक्त एअरटेल पेमेंट्स अ‍ॅप, ग्रो अ‍ॅप अशा अ‍ॅप्सच्या मदतीने देखील तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे बरेच फायदे देखील आहेत. डिजिटल गोल्ड घेतल्यामुळे दागिने घेताना लागणारे 'मेकिंग चार्जेस' द्यावे लागत नाहीत. त्यामुळे तुलनेने तेवढ्याच ग्रॅमचं सोनं स्वस्तात मिळतं. त्यामुळे यंदा तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT