Buzz Aldrin Sakal
विज्ञान-तंत्र

Buzz Aldrin : चंद्रावर चालणाऱ्या अंतराळवीराने केले ९३ व्या वर्षी चौथे लग्न; पत्नी आहे...

अपोलो 11 मोहिमेचा एक भाग म्हणून नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन 1969 मध्ये चंद्रावर गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकन अंतराळवीर बझ ऑल्ड्रिनने शुक्रवारी वयाच्या 93 व्या वर्षी चौथे लग्न केले. त्यांची पत्नी डॉ. अंका फॉर या 63 वर्षांच्या आहेत. खुद्द ऑल्ड्रिनने ट्विटरवर ही माहिती दिली. त्याने लिहिले - घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या किशोरांसारखे आम्ही दोघेही उत्साहित आहोत.

अपोलो 11 मोहिमेचा एक भाग म्हणून नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन 1969 मध्ये चंद्रावर गेले होते. नील आर्मस्ट्राँग हे पहिले चंद्रावर उतरले होते. बझ ऑल्ड्रिनने त्याच्यानंतर 19 मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवले.

93 व्या वाढदिवसानिमित्त केले लग्न :

बझ आल्ड्रिनने लग्नानंतर पत्नी अंकासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले- माझ्या 93 व्या वाढदिवसानिमित्त, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, मी माझ्या प्रिय डॉक्टर अंका फॉर यांच्याशी लग्न केले आहे. लॉस एंजेलिसमध्ये एका छोट्याशा समारंभात आमचं लग्न झालं.

ट्विटर वापरकर्त्यांनी केले अभिनंदन :

बझ ऑल्ड्रिनच्या पोस्टला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ट्विटर युजर्स त्यांचे अभिनंदन करत आहेत. एका यूजरने लिहिले - तुम्हाला चंद्रावर उतरल्यासारखे वाटत असेल. दुसर्‍या यूजरने लिहिले- वाढ

दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या लग्नासाठी शुभेच्छा.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

अपोलो मिशनचे एकमेव जिवंत सदस्य :

अपोलो 11 च्या तीन सदस्यांच्या क्रूमधील बझ ऑल्ड्रिन हा एकमेव जिवंत सदस्य आहे. मिशनमध्ये त्यांच्यासोबत गेलेल्या इतर दोन सदस्यांचे निधन झाले आहे.

बझ ऑल्ड्रिन 1971 मध्ये नासातून निवृत्त झाले. त्यांनी 1998 मध्ये शेअर स्पेस फाउंडेशनची स्थापना केली. त्याचा उद्देश अवकाश संशोधनाला चालना देणे हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT