Robotic Fruit Picking Sakal
विज्ञान-तंत्र

एआयचा वापर करून रोबोटिक यंत्रणा विकसित; वेचणार सडकी फळे

Robotic Fruit Picking: या रोबोटिक सिस्टीमच्या डिझाइनबाबत या चमूला पेटंट मिळाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Robotic Fruit Picking: फळ प्रक्रिया उद्योगात खराब फळांमुळे इतर फळे खराब होऊन मोठे नुकसान होते. ते टाळण्यासठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करून एक रोबोटिक यंत्रणा विकसित करण्यात श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या सात प्राध्यापकांना यश आले असून, या रोबोटिक फ्रूट पिकिंग सिस्टिमसाठी त्यांना पेटंट मंजूर झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरातील श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या यांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. हुलास तोंडे, प्रा. हर्षल चोथे, प्रा. गौरव देशपांडे, प्रा. दीपक देशमुख, प्रा. आकाश कोडारकर, प्रा. ब्रिजभूषण शुक्ला आणि प्रा. जुबेर शेख यांनी हे संशोधन केले आहे. यांत्रिकी प्रणाली, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या तीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत हे डिझाइन बनवले आहे. यासाठी त्यांना एका वर्षाचा कालावधी लागला.

या रोबोटिक सिस्टीमच्या डिझाइनबाबत या चमूला पेटंट मिळाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. याबद्दल श्रीयश प्रतिष्ठानचे अध्यक्ष बसवराज मंगरुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल जॉय डॅनियल, प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील, अधिष्ठाता अकॅडमिक्स डॉ. पी. एम. अर्धापूरकर आणि ट्रैनिंग ॲण्ड प्लेसमेंट प्रमुख प्रा. अनिल पालवे यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

असे आहे रोबोटिक फ्रूट पिकिंग

फळ प्रक्रिया उद्योगात सडलेल्या फळांचा प्रश्न.

रोबोटिक यंत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा केला वापर.

यंत्र एआयच्या मदतीने सडलेली फळे ओळखते.

त्यानंतर सडकी फळे प्रक्रियेत येण्याआधी काढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT