Byju's App Removed From Play Store esakal
विज्ञान-तंत्र

Byju's अडचणीत! गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप गायब, मोठा फ्रॉड केल्याप्रकरणी कंपनीवर कारवाई? नेमका विषय काय..जाणून घ्या

Byju's App Removed From Play Store : बायजूसचे मुख्य अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवले गेले आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असलेल्या कंपनीने AWS व BCCI ची देणी न भरल्यामुळे ही कारवाई झाली.

Saisimran Ghashi

Byju's Latest Update : भारतातील एकेकाळी आघाडीवर असलेल्या एज्युटेक कंपनी Byju's च्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. कंपनीचे मुख्य शिक्षण अ‍ॅप Byju’s Learning App गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे. ही कारवाई Amazon Web Services (AWS) या सेवा पुरवठादाराला थकलेली रक्कम न दिल्यामुळे झाल्याचे वृत्त आहे.

Byju's सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असून, कंपनीचा सर्व व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार Insolvency Resolution Professional (IRP) यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. याच प्रक्रियेच्या दरम्यान थकबाकी आणि देयकांच्या समस्यांमुळे गुगलने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, Think and Learn Pvt. Ltd. या ब्रँडअंतर्गत चालणारी Byju’s च्या इतर अ‍ॅप्स जसे की Byju's Premium Learning App आणि Byju’s Exam Prep App अद्याप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

Byju's Learning App हे अ‍ॅप विशेषतः इयत्ता 4 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये मार्गदर्शन करत होते. याशिवाय JEE, NEET, IAS यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठीही या अ‍ॅपवर विशेष अभ्यासाचे साहित्य उपलब्ध होते. सध्या हे अ‍ॅप Apple च्या App Store वर उपलब्ध आहे, परंतु Android वापरकर्त्यांसाठी ते वापरण्यासाठी थेट डाऊनलोड लिंक किंवा आधीपासून इन्स्टॉल केलेले अ‍ॅपच एकमेव पर्याय आहेत.

दुसरीकडे, National Company Law Tribunal (NCLT) नेही Byju's विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. ही कारवाई Glas Trust या कर्जपुरवठादाराच्या विनंतीनुसार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे Byju’s ने एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक म्हणून काम पाहिले होते.

2019 मध्ये BCCI सोबत करार करून Byju's ने आपल्या ब्रँडचं प्रमोशन क्रिकेट सामने आणि संघाच्या युनिफॉर्मवर केलं होतं. मात्र, त्यासाठी BCCI ला सुमारे 158.9 कोटी रुपयांचे देयक देण्यास कंपनी अपयशी ठरली. त्यामुळे ही प्रकरण आता अधिक गंभीर बनली आहे.

या संपूर्ण परिस्थितीत Byju’s चे आर्थिक व्यवस्थापन IRP च्या हातात असून भविष्यात कंपनीची काय भूमिका असेल याकडे संपूर्ण उद्योगक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे देशातील मोठ्या एज्युटेक स्टार्टअप्सच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT