iPhone 15 Charger eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Charger : टाईप-सी पोर्ट आलं, मात्र अँड्रॉईड केबलने चार्ज करू नका आयफोन-15; अ‍ॅपलचा ग्राहकांना इशारा

Android type C Charger : iPhone 15 या सीरीजचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये देण्यात आलेला सी-टाईप चार्जिंग पोर्ट.

Sudesh

iPhone 15: सीरीजचं ठळक वैशिष्ट्य.

अ‍ॅपलने नुकतीच आपली नवीन आयफोन सीरीज लाँच केली आहे. iPhone 15 या सीरीजचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये देण्यात आलेला सी-टाईप चार्जिंग पोर्ट. या पोर्टमुळे आता आयफोन चार्ज करण्यासाठी लाईटनिंग केबलची गरज भासणार नाही.

यामुळेच कित्येक यूजर्सना असाही प्रश्न पडला आहे, की त्यांच्याकडे असणाऱ्या अँड्रॉईड केबलने ते नवा आयफोन-15 चार्ज करू शकतील का? याबाबत अ‍ॅपल कंपनीने स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे. अँड्रॉईड केबलने चार्जिंग शक्य असलं, तरी तसं न करण्याचा इशारा कंपनीने यूजर्सना दिला आहे.

हीटिंग इश्यू

अ‍ॅपलने आपल्या आयफोनसाठी नवीन यूएसबी सी-टू-सी चार्जिंग केबल लाँच केली आहे. या केबलमधील टेक्नॉलॉजी आणि अँड्रॉईड केबलमधील टेक्नॉलॉजी वेगळी असल्यामुळे, आयफोनसाठी अँड्रॉईड केबल न वापरण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे. असं केल्यास, फोन गरम होत असल्याचा इशाराही अ‍ॅपलने दिला आहे.

iPhone 15 सीरीजमधील फोन चार्ज करण्यासाठी अँड्रॉईड केबलचा वापर केल्यास या फोनमध्ये हीटिंग इश्यू येत असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय. यामुळेच अ‍ॅपल स्टोअरकडूनही ग्राहकांना अ‍ॅपलचीच चर्जिंग केबल घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

ग्राहकांचं वेगळं मत

आयफोन-15 सोबत आपण कंपनीचीच केबल घ्यावी यामुळे अ‍ॅपल असा इशारा देत असल्याचं मत कित्येक ग्राहकांनी व्यक्त केलं आहे. मात्र, कोणताही मोबाईल वापरत असताना, शक्यतो त्या मोबाईलसोबत मिळणारा किंवा त्या कंपनीचाच चार्जर आणि केबल वापरावी असा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: धोकादायक कफ सिरप नकोच..! लहान मुलांना खोकला झाल्यावर 'हा' रामबाण उपाय करा

SCROLL FOR NEXT