U19 World Cup: भारताची 'यंगिस्तान' सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! अंतिम सामन्यात इंग्लंडवर मिळवला 'वैभव'शाली विजय

India Won U19 World Cup 2026: भारतीय संघाने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. शुक्रवारी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत विश्वविजेतेपद जिंकले.
India Won U19 World Cup 2026

India Won U19 World Cup 2026

Sakal

Updated on

U19 Team India Win 6th World Cup: आयुष म्हात्रेच्या नेतृ्त्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद मिळवलं आहे. हरारेमध्ये शुक्रवारी (६ फेब्रुवारी) झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या युवा संघाने इंग्लंडच्या युवा संघाला १०० धावांनी पराभूत केले.

या विजयासह युवा भारतीय संघ (U19 Team India) सहाव्यांदा विश्विविजेता झाला आहे. यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये भारताने १९ वर्षांखाली वर्ल्ड कप (U19 World Cup) जिंकला होता. भारताला अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा (Vaibhav Suryavanshi) मोलाचा वाटा होता.

अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर (IND vs ENG) ऐतिहासिक ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकात ३११ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या जवळपास सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. इंग्लंडसाठी बेन डावकिन्स, बेन मायेस आणि सॅलेब फाल्कोनर यांनी चांगली झुंज दिली, पण त्यांना संघाला विजयापर्यंत नेता आले नाही.

<div class="paragraphs"><p>India Won U19 World Cup 2026</p></div>
U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com