Car Craze esakal
विज्ञान-तंत्र

Car Craze : मारुतीच्या या हॅचबॅक कारची बाजारात चांगलीच क्रेज, ही कार लोकांना एवढी का आवडते? वाचा फिचर

अलीकडच्या काळात या सेगमेंटमध्ये एका मॉडेलला जास्त मागणी आहे आणि ती म्हणजे मारुती सुझुकी बलेनो

साक्षी राऊत

Car Craze : भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक कारला नेहमीच खूप मागणी असते. या सेगमेंटमध्ये विविध ब्रँड्सची बरीच मॉडेल्स उपलब्ध आहेत, परंतु अलीकडच्या काळात या सेगमेंटमध्ये एका मॉडेलला जास्त मागणी आहे आणि ती म्हणजे मारुती सुझुकी बलेनो. आज आपण या कारबाबत सविस्तर जाणून घेऊया.

व्हॅरिएंट आणि कलर ऑप्शन

मारुती सुझुकी बलेनो भारतीय बाजारपेठेत सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. ही प्रीमियम हॅचबॅक कार बाजारात एकूण 6 मोनोटोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात नेक्सा ब्लू, पर्ल आर्क्टिक व्हाइट, ग्रॅंड्यूअर ग्रे, स्प्लिंडिड सिल्व्हर, ऑप्युलंट रेड, लक्स बेज आणि पर्ल मिडनाईट ब्लॅक या रंगांचा समावेश आहे.

डायमेंशन

कारची लांबी 3,990 मिमी, रुंदी 1,745 मिमी आणि उंची 1,500 मिमी आहे. पेट्रोल ऑप्शनमधे 318 लीटर बूट स्पेस आणि CNG ऑप्शनमधे 55 लीटर बूट स्पेस मिळते.

इंजिन आणि मायलेज

बलेनोला 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळते, जे 90PS/113Nm आउटपुट जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल किंवा पाच-स्पीड AMT ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हेच इंजिन CNG मॉडेलमध्ये 77.49PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. यात फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.

त्याचे 1.2-लिटर एमटी 22.35 किमी/ली, एएमटी 22.94 किमी/ली आणि एमटी सीएनजी प्रकार 30.61 किमी/किलो मायलेज देते.

फिचर

वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अर्कामीस साउंड सिस्टीम, क्रूझ कंट्रोलसह हेड-अप डिस्प्ले, ऑटो एसी, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि कीलेस एंट्री यासारखी वैशिष्ट्ये कारमध्ये आहेत. सुरक्षेच्या बाबतीत, यात सहा एअरबॅग, EBD सह ABS, हिल-होल्ड असिस्ट, ISOFIX अँकरेज, मागील पार्किंग सेन्सर्स आणि 360-डिग्री कॅमेरा मिळतो. (Automobile)

या कारची किंमत किती?

दिल्लीतील मारुती बलेनोची किंमत रु.6.61 लाख ते रु.9.88 लाख आहे. (Maruri Suzuki)

या कारची स्पर्धा कोणाशी ?

मारुती बलेनोची स्पर्धा Tata Altroz ​​शी आहे, ज्यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT