Car Driving Tips
Car Driving Tips Sakal
विज्ञान-तंत्र

Car Driving Tips: लहान मुलांसोबत कारने प्रवास करताय? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

पुजा बोनकिले

Car Driving Tips follow these tips while traveling with child

जगभरातील लोकांना कुटूंबासह कारने प्रवास करायला आवडते. लहान मुलांनाही गाडीतून प्रवास करायला आवडते. पण काही निष्काळजीपणामुळे मुलांना दुखापत होण्याचा धोका असतो. जर तुम्ही लहानमुलांसोबत कारने प्रवास करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

  • सीट बेल्ट बांधावे

लहान मुलांसोबत कारने प्रवास करताना साट बेल्ट लावणे गरजेचे असते. सीट बेल्ट लावल्याने अपगाताच्या वेळी कोणतेही दुखापत होत नाही. लहान मुलांना सीट बेल्ट न लावल्यास ते कार चालवताना अडथळा निर्माण करू शकतात. तसेच मोठ्यांनी देखील कार चालवताना सीट बेल्ट लावावे.

  • सनरूफ बाहेर काढू नका

अनेक लोक मुलांसोबत कारने प्रवास करतात सनरूफ उघडे ठेवतात. अनेक वेळा मुलं उघड्या सनरूफमधून बाहेर पडतात. मुलांना हे करताना बरे वाटत असले तरी अशा प्रकारे प्रवास केल्याने धोका वाढतो. जेव्हा मुले सनरूफ किंवा उघड्या खिडक्यांमधून बाहेर मान काढून पाहतात तेव्हा त्यांना दुखापत होण्याचा धोका असतो. दुसरीकडे, पोलिस अशा प्रवासासाठी दंड देखील आकारू शकतात.

  • चाइल्ड लॉक वापरा

तुम्ही कारमधुन मुलांसोबत प्रवास करत असाल तर चाइल्ड लॉक करावे. यामुळे मुले आतून कारचे दार उघडू शकत नाही. अनेक कारमध्ये ही सोय असते. कारण लहान मुले चालत्या कारमध्ये दार उघडू शकतात. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.

  • खास सीट

जर तुम्ही लहान मुलांसोबत कराने प्रवास करत असाल तर त्यांना सामान्य सीटवर बसवू नका. त्याएवजी चार ते सहा वयोगटातील मुलांसाठी खास सीट्स बाजारात उपलब्ध असतात. या सीट्स वापरल्यास मुलांना अधिक सुरक्षितता मिळते.

  • खाण्यापिण्याच्या गोष्टी

कारने मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्ही खाण्या-पिण्याच्या गोष्टी सोबत ठेवल्या पाहिजे. कारण लहान मुलांना भूक लागल्यास किंवा तहान लागल्यास लगेच देऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT