Car Feature eSakal
विज्ञान-तंत्र

Car Feature : कारचं 'हे' फीचर करतं तुमचा कॅन्सरपासून बचाव; बनवणाऱ्याला म्हणाल थँक्स!

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

Sudesh

तुमच्या कारमध्ये तुमच्या सुरक्षेसाठी कित्येक फीचर्स देण्यात आलेले असतात. कार घेण्यापूर्वी कित्येक लोक त्यातील सेफ्टी फीचर्स, सेफ्टी रँकिंग अशा कित्येक गोष्टी आपण तपासतो. हे फीचर्स मुख्यतः अपघातादरम्यान तुम्हाला सुरक्षा पुरवतात.

मात्र, तुमच्या कारचं एक फीचर असंही आहे जे तुम्हाला कॅन्सर या जीवघेण्या आजारापासून वाचवतं. सध्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या जवळपास सर्व कारमध्ये हे फीचर आढळतं. हे फीचर म्हणजे, यूव्ही कट ग्लास.

कारच्या विंडशील्ड आणि खिडक्यांच्या काचा या यूव्ही कट ग्लासच्या बनवलेल्या असतात. सूर्याच्या अतिनील (अल्ट्राव्हायलेट) किरणांपासून आत बसलेल्या व्यक्तीची सुरक्षा करण्यासाठी ही खास प्रकारची काच वापरण्यात आलेली असते. यामुळे हे यूव्ही रेज तुमच्या त्वचेवर थेट पडत नाहीत.

यूव्ही रेजमुळे त्वचेचा कॅन्सर

सूर्याच्या या अतिनील किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. यामुळेच काही दिवसांपूर्वी नेदरलँड सरकारने आपल्या देशातील नागरिकांना सनस्क्रीन वाटण्याचाही निर्णय घेतला होता.

९० टक्के सुरक्षा

यूव्ही कट ग्लास ही यूव्ही रेजना ९० टक्क्यांपर्यंत डिफ्लेक्ट करतात. यामुळे आत बसलेल्या व्यक्तींना या रेजचा फटका बसत नाही. तसंच कार अति प्रमाणात गरम होत नाही.

यूवी कट ग्लास असतानाही जर तुम्हाला अधिक सुरक्षेची गरज आहे, तर तुम्ही काचेवर यूव्ही कोटिंग देखील करून घेऊ शकता. यानंतर कारमध्ये यूव्ही किरणे आजिबातच येऊ शकत नाहीत.

फुटल्यावर सुरक्षा

यूव्ही कट ग्लासचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे, फुटल्यानंतर ही काच लहान-लहान गोलाकार तुकड्यांमध्ये रुपांतरित होते. त्यामुळे काचेचे तुकडे शरीरात घुसण्याचा धोका टळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT