Low Safety Rating Cars esakal
विज्ञान-तंत्र

Low Safety Rating Cars : सुरक्षेच्या बाबतीत या कार तुम्हाला देतील निराशा, येथे वाचा लिस्ट

भारतात बिनधास्तपणे विकल्या जाणाऱ्या या गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने अगदीच निराशाजनक आहेत

सकाळ ऑनलाईन टीम

Low Safety Rating Cars : कार घेताना कोणीही आधी कारचे सेफ्टी फिचर्स आवर्जून चेक करतात. तर काही लोक त्यांच्या बजेटमधील कार घेण्यासाठी किंमतींवर फोकस करतात. तुम्ही जर नवीन बजेट कार घेण्याच्या विचार करत असाल तर तुम्हाला या काही लो रेटिंग कार माहिती असायलाच हव्यात. नाहीतर अशा कार्स घेऊन तुम्ही तुमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय.

भारतात बिनधास्तपणे विकल्या जाणाऱ्या या गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने अगदीच निराशाजनक आहेत. जर तुम्ही बजेट कार घेण्याचा विचार करत असाल तर कारबद्दल या काही गोष्टी जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तेव्हा कार घेण्याआधीच सेफ्टीच्या बाबततीत लो रेटिंग असणाऱ्या या गाड्यांची यादी नक्की वाचा.

या यादीत देशातील सर्वोच्च कार उत्पादक कंपनी मारुतीच्या सर्वाधिक गाड्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये मारुती स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे. NCAP सुरक्षा रेटिंगमध्ये, कारला अॅडल्ट प्रोटेक्शन आणि चाइल्ड संरक्षण दोन्हीमध्ये फक्त 1 स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

दुसऱ्या क्रमांकावर मारुती एस-प्रेसो कार आहे, ज्याला अॅडल्ट प्रोटेक्शन 1 स्टार आणि चाइल्ड संरक्षणात 0 स्टार देण्यात आले आहे.

मारुतीची इग्निस कार तिसर्‍या क्रमांकावर आहे, जी सुरक्षिततेच्या दृष्टीने S-Presso च्या बरोबरीची आहे, म्हणजे अॅडल्ट प्रोटक्शनमध्ये 1 स्टार आणि चाइल्ड प्रोटेक्शनमध्ये 0 स्टार आहे.

चौथ्या क्रमांकावर मारुतीची वॅगन-आर कार आहे. NCAP क्रॅश टेस्ट ऑक्टोबर 2019 नुसार, या कारला 2 स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

या यादीत पाचव्या क्रमांकावर Hyundai ची Grand i10 Nios कार आहे. NCAP क्रॅश टेस्ट नोव्हेंबर 2020 मध्ये, या कारला अॅडल्ट आणि चाइल्ड अशा दोन्ही श्रेणींमध्ये केवळ 2 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे.

Renault Kwid कार या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. बजेट श्रेणीतही ही कार खूप पसंत केली जाते. NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये सुरुवातीला कारला झिरो रेटिंग देण्यात आले होते. यानंतर कंपनीने त्यात काही सुधारणा केल्या, त्यानंतरही या कारला फक्त 1 स्टार रेटिंग मिळू शकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT