Car Tips esakal
विज्ञान-तंत्र

Car Tips : गाडीचा टायर पाहून टॉप स्पीड कळणार, या पद्धतीने करा चेक

आजकाल प्रत्येकाकडे चारचाकी गाड्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

Car Tips : आजकाल प्रत्येकाकडे चारचाकी गाड्या आहेत पण सर्वच लोकांना त्या बद्दल पूर्ण माहिती असतेच असं नाही. गाडीच्या टायरवर 225/50R 17 87V असे काही नंबर लिहिलेले असतात हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल. हे आकडे पाहून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की गाडीच्या प्रत्येक टायरवर हा नंबर का लिहिलेला असतो. ते लिहिण्यामागचे कारण काय आणि फायदा काय.

तर टायरचा टॉप स्पीड तपासण्यासाठी हे नंबर लिहिलेले असतात. शिवाय इतरही अनेक कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला टायरवर लिहिलेल्या या क्रमांकांमागील मोठं कारण सांगणार आहोत आणि टायर पाहून तुम्ही गाडीचा टॉप स्पीड कसा तपासू शकता हे ही सांगणार आहोत.

टायरवरील आकड्यांचा अर्थ काय आहे?

गाडीच्या टायरवर लिहिलेले आकडे बघून आपल्याला टायरचा आकार, रुंदी, टायरची उंची, आणि कोणत्या रिममध्ये बसू शकतात, टायरचा टॉप स्पीड किती आहे आणि त्याचे लोड किती आहे हे कळते.

टायरवर लिहिलेल्या आकड्यांवरून टॉप स्पीड कसा शोधायचा

आता जर तुम्हाला टायर बघून तपासायचं असेल तर तो कोणत्या टॉप स्पीडसाठी चांगला आहे किंवा या टायरचा कमाल टॉप स्पीड किती आहे, तर तुम्ही टायरवर लिहिलेल्या नंबरचा शेवटचं लेटर पाहा.

वेगवेगळे लेटर्स हाय स्पीड दर्शवतात. जसं की V म्हणजे 240kmph चा टॉप स्पीड किंवा Y म्हणजे 300kmph पर्यंतचा स्पीड. त्यामुळे याआधी माहीत नसताना टायर खरेदी केले असतील पण इथून पुढे आकडे बघूनच टायर खरेदी करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT