Car Insurance Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Car Insurance Tips : प्राण्याने गाडीला टक्कर दिल्यास इन्शुरन्स क्लेम होतो का? कोणत्या प्रकारचा विमा घ्यावा? जाणून घ्या

Insurance Claim : कॉम्प्रिहॅन्सिव्ह पॉलिसी ही कारला नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि आगीच्या घटनांपासून झालेल्या नुकसानाला कव्हर करते.

Sudesh

Car Insurance : गाडीचा विमा असेल, तर अपघातामुळे होणाऱ्या नुकसानाची चिंता कमी होते. बहुतांश अपघातांच्या घटनांमध्ये इन्शुरन्स कंपन्या दुरुस्तीचा खर्च उचलतात. मात्र, जर एखाद्या प्राण्यामुळे गाडीला नुकसान झाले तर? अशा वेळी तुमची विमा कंपनी क्लेम मंजूर करायला तयार होईल का?

बऱ्याच वेळा शहरांमध्ये किंवा हायवेवर देखील गाय-म्हैस असे मोठे प्राणी मोकळेपणे फिरत असतात. अशा प्रकारचे प्राणी चिडून कधी कुणावर हल्ला करतील हे सांगता येत नाही. अशा वेळी जर बैल किंवा रेड्याने तुमच्या कारला टक्कर मारली, तर कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.(Latest Marathi News)

अशा वेळी तुम्ही कोणावर दोषही टाकू शकत नाही. त्यामुळे केवळ इन्शुरन्स कंपनीकडे जाणं हाच पर्याय तुमच्याकडे उरतो. मात्र अशा वेळी तुमच्याकडे योग्य प्रकारचा विमा असणं गरजेचं आहे. तरच विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देऊ शकेल.

कोणता इन्शुरन्स फायद्याचा?

जर तुमच्याकडे थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असेल, तर अशा अपघातांमध्ये कंपनी कोणत्याही प्रकारची भरपाई देत नाही. कारण, अशा डॅमेजला यामध्ये कव्हर करण्यात येत नाही. त्यामुळे प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानासाठी तुम्हाला कॉम्प्रिहॅन्सिव्ह पॉलिसी घेणं फायद्याचं ठरतं.

कॉम्प्रिहॅन्सिव्ह पॉलिसी ही कारला नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि आगीच्या घटनांपासून झालेल्या नुकसानाला कव्हर करते. यामध्ये उंदीर, कुत्रा, मांजर अशा लहान प्राण्यांपासून झालेलं नुकसान देखील भरुन मिळू शकतं. यामुळे कारसाठी इन्सुरन्स घेताना कॉम्प्रिहॅन्सिव्ह पॉलिसी घेणं फायद्याचं ठरतं.

पॉलिसी घेताना हे पाहा

कारसाठी इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्यामध्ये कोणत्या गोष्टी कव्हर करण्यात आल्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही विविध कंपन्यांच्या विमा पॉलिसींची तुलना करून पाहू शकता. कमीत कमी प्रीमियम आणि जास्त फायदे देणारी पॉलिसी कधीही उत्तम. सोबतच, कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ किती आहे हे पाहणंही गरजेचं आहे. अशा प्रकारे विविध गोष्टी तपासून तुम्ही योग्य पॉलिसी निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT