24 Hours Electricity in India esakal
विज्ञान-तंत्र

Electricity in India : देशात मिळणार २४ तास वीज; वीजनिर्मिती क्षमता ३.३७ लाख मेगावॉटने वाढणार

Power Consumption : विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात वीजवितरण व्यवस्था सक्षम करण्यात येणार: केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक

Saisimran Ghashi

Electricity in India Update : देशभरात २४ तास सुरळित वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात वीजवितरण व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत २०३२ पर्यंत ३.३७ लाख मेगावॉटने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिली.

केंद्र सरकारने देशात सुरळित वीजपुरवठा करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जाविकास योजना आणि प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेच्या माध्यमातून १.८५ लाख कोटी खर्च करण्यात आले. त्यातून १८,३७४ खेड्यांचे विद्युतीकरण, तर २.८६ कोटी घरांपर्यंत वीज पोहोचविण्यात आली. त्यानंतर आता देशभरात २४X७ विनाअडथळा वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडून वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यावर भर दिली जात आहे.

मागील दहा वर्षात देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत २.१४ लाख मेगावॉटची भर पडल्याने जून २०२४ पर्यंत देशाची एकूण वीजनिर्मिती क्षमता ४.४६ लाख मेगावॉट इतकी झाली आहे. त्याशिवाय मागील दहा वर्षात वीजवितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी एक लाख ९५ हजार १८१ किलोमीटरचे जाळे विणले.

राज्यात तीन हजार मेगावॉटचे औष्णिक प्रकल्प उभारणार

राज्याला अखंड वीज पुरवठा व्हावा, म्हणून महानिर्मिती १५ हजार कोटी रूपये खर्चून तीन हजार मेगावॉटचे औष्णिक वीज प्रकल्प उभारणार आहे. सध्या देशात अक्षय ऊर्जानिर्मितीवर भर दिला आहे. त्यामुळे ग्रीडची फ्रिक्वेन्सी राखण्यासाठी औष्णिक वीज आणि जलविद्युत निर्मिती क्षमता तुलनेने कमी दिसत आहे. त्यामुळे केंद्राने देशात ८० हजार मेगावॉट क्षमतेचे औष्णिक प्रकल्प उभारण्याचे निर्देश राज्यांना दिले. त्यानुसार महानिर्मिती कोराडी वीज केंद्रात ६६० मेगावॉटचे दोन संच, तर उर्वरित १६८० मेगावॉटचा प्रकल्प उभारण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे वीज प्रकल्पासाठी जवळपास १५ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. सदरचा निधी रूरल इलेक्ट्रिफिकेशन कार्पोरेशन आणि पॉवर फायनान्स कार्पोरेशनकडून कर्जरुपाने उभा केला जाणार आहे.

कशी वाढणार वीजनिर्मिती क्षमता? (आकडे मेगावॉटमध्ये)

औष्णिक ८०,०००

जलविद्युत २५,०१०

अणुऊर्जा १४,३००

पंपस्टोरेज ५०,७६०

लघु जलविद्युत ५१०

सौरऊर्जा १,४३,९८०

पवनऊर्जा २३,३४०

एकूण ३,३७,९००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT