Google Chrome hacking alert CERT-In esakal
विज्ञान-तंत्र

Chrome Risk CERT : सतत गुगल वापरताय? मिनिटात हॅक होऊ शकतो मोबाईल अन् लॅपटॉप, केंद्र सरकारने सांगितल्या सुरक्षेच्या टिप्स

CERT-In ने Google Chrome वापरकर्त्यांसाठी सुरक्षेचा इशारा दिला आहे. तुमचं डिव्हाइस हॅकर्सच्या निशाण्यावर असू शकतं.

Saisimran Ghashi

Google Chrome hacking alert : भारत सरकारच्या सायबर सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या CERT-In (Indian Computer Emergency Response Team) या संस्थेने Google Chrome वापरकर्त्यांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. विंडोज, मॅक आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर Chrome वापरणाऱ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. CERT-In च्या मते, Chrome मध्ये आढळलेल्या अनेक त्रुटींचा फायदा घेत सायबर गुन्हेगार तुमचं डेटा चोरू शकतात किंवा तुमचं डिव्हाइस रिमोटने कंट्रोल करू शकतात.

काय आहे Chrome मधील धोकादायक त्रुटी?

१० मे २०२५ रोजी CERT-In ने दिलेल्या अलर्टमध्ये Google Chrome ब्राउझरमधील खालील प्रकारच्या त्रुटींचा उल्लेख करण्यात आला आहे

  • HTML मधील Heap Buffer Overflow

  • Out-of-bounds Memory Access

  • DevTools मध्ये चुकीची अंमलबजावणी

  • अपुरी Data Validation

या त्रुटींचा फायदा घेण्यासाठी हॅकर्स खोट्या वेबसाईट्सचा वापर करून युजर्सना फसवतात आणि त्यामार्फत ते तुमचं खाजगी डेटा चोरी करू शकतात किंवा तुमचं सिस्टिम हॅक करून रिमोट अ‍ॅक्सेस घेऊ शकतात.

कोणते युजर्स आहेत धोक्यात?

जर खालील Chrome आवृत्त्या (versions) तुमच्या डिव्हाइसवर वापरात असतील, तर तुम्ही या धोक्याच्या झोनमध्ये येता

  • Linux: 136.0.7103.59 च्या आधीचे एडिशन

  • Windows / macOS: 136.0.7103.48 किंवा 49 च्या आधीचे एडिशन

सुरक्षित राहण्यासाठी काय करावं?

Google ने या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नवीन सुरक्षा अपडेट्स जारी केली आहेत. खालील स्टेप्सने तुमचं Chrome अपडेट करा

  1. Chrome उघडा

  2. वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स वर क्लिक करा

  3. Settings > About Chrome या पर्यायावर जा

  4. Chrome आपोआप नवीन अपडेट शोधेल

  5. अपडेट मिळाल्यास ते इंस्टॉल करा आणि ब्राउझर रिस्टार्ट करा

हे केवळ नियमित अपडेट नाही. ही त्रुटी Remote Code Execution प्रकाराची असल्यामुळे हॅकर्स व्यक्तीगतच नव्हे, तर व्यावसायिक सिस्टम्सही टार्गेट करू शकतात. CERT-In ने या इशाऱ्याला ‘High Severity’ दर्जा दिला आहे, त्यामुळे अपडेट करणे अत्यावश्यक आहे.

Chrome सुरक्षित ठेवण्यासाठी ५ महत्त्वाचे उपाय

  1. Chrome कायम अपडेट ठेवा
    Settings > About Chrome वर जाऊन अपडेट तपासा.

  2. Safe Browsing मोड अ‍ॅक्टिव्ह करा
    Settings > Privacy and Security > Security > Enhanced Protection निवडा.

  3. बळकट आणि वेगवेगळे पासवर्ड वापरा
    Chrome चा Password Manager वापरून सुरक्षित पासवर्ड जनरेट करा.
    Settings > Autofill > Password Manager

  4. फक्त विश्वासार्ह एक्सटेंशन्स वापरा
    chrome://extensions/ येथे जाऊन संशयास्पद एक्सटेंशन्स हटवा.

  5. ब्राउझिंग डेटा नियमितपणे क्लिअर करा
    Settings > Privacy and Security > Clear Browsing Data वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT