Chandrayaan 2 New Research : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-2 मोहिमेने चंद्राच्या वातावरणाविषयी एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. वैज्ञानिकांच्या आधीच्या अनुमानांना छेद देत, चंद्र जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या मागील भागातून (Geomagnetic Tail) प्रवास करतो, तेव्हा प्लाझ्मा घनता कमी होत नाही, उलट अनपेक्षितपणे जास्त इलेक्ट्रॉन घनता आढळते.
विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीच्या संशोधकांनी चंद्राच्या आयनोस्फिअरमध्ये 23,000 इलेक्ट्रॉन्स प्रति घन सेंटीमीटर एवढी उच्च इलेक्ट्रॉन घनता नोंदवली आहे. हा शोध The Astrophysical Journal - Letters मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या पृष्ठभागावर असलेली उरलेली चुंबकीय क्षेत्रे (Lunar Crustal Magnetic Fields) प्लाझ्माला अडकवतात, ज्यामुळे त्याचे diffusion थांबते आणि स्थानिक पातळीवर इलेक्ट्रॉन घनतेत वाढ होते.
या निष्कर्षाला पाठिंबा देण्यासाठी, वैज्ञानिकांनी Three-Dimensional Lunar Ionospheric Model (3D-LIM) चा वापर करून संगणकीय सिम्युलेशन्स केले. त्यात असे आढळले की चंद्राच्या आयनोस्फिअरमध्ये फोटोकेमिकल समतोल (Photochemical Equilibrium) राहणे आवश्यक आहे जेणेकरून उच्च प्लाझ्मा घनता कायम राहू शकेल.
हा शोध भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कारण उच्च प्लाझ्मा घनता रेडिओ कम्युनिकेशनवर परिणाम करू शकते, चंद्राच्या पृष्ठभागावरील विद्युतभार (Surface Charging) वाढवू शकते, तसेच चंद्राच्या धुळीच्या कणांवरही प्रभाव टाकू शकते.
विशेषतः, चंद्रावर मानवी वस्तीसाठी (Lunar Habitats) योजना आखताना या संशोधनाचा विचार करावा लागेल, कारण स्थानिक चुंबकीय क्षेत्रामुळे प्लाझ्मा डायनॅमिक्समध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात.
हा शोध चंद्राच्या गुंतागुंतीच्या प्लाझ्मा वातावरणाच्या अभ्यासासाठी महत्वाचा आहे. भारताचे चांद्रयान-2 केवळ लँडर आणि रोव्हरसाठी नव्हे, तर चंद्राच्या विज्ञान-शोध मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ऑर्बिटर मिशन ठरत आहे.
ISRO च्या या महत्त्वपूर्ण शोधामुळे चंद्राच्या आयनोस्फिअरची अधिक स्पष्ट समज मिळणार आहे आणि भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी अधिक प्रभावी नियोजन करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.