Chandrayaan 3 Luna 25 eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Update : रशियाचं 'लूना २५' घालणार 'चांद्रयान ३'ला खोडा? एकाच दिवशी दोघेही पोहोचणार चंद्रावर!

Russia Luna 25 : चंद्राच्या दक्षिण भागात पहिल्यांदा उतरण्याचा विक्रम रशियाच्या नावे होऊ शकतो.

Sudesh

ISRO Moon Mission : चांद्रयान-३ च्या माध्यमातून इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. मात्र, आता हा विक्रम रशियाच्या नावे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१४ जुलै रोजी इस्रोने 'चांद्रयान-३'चं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. सध्या हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची इस्रोची योजना आहे. दरम्यान, रशिया देखील आपलं लूना-२५ हे यान चंद्रावर पाठवत असून; ते चांद्रयानाच्या आधी चंद्रावर उतरू शकतं. (Chandrayaan 3 Update)

रशियाची चांद्रमोहीम

रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोस आपलं लूना-२५ हे यान चंद्रावर पाठणार आहे. ११ ऑगस्टला या यानाचं प्रक्षेपण असणार आहे. त्यानंतर पाच दिवसांत ते चंद्राच्या जवळ पोहोचेल. यानंतर पुढचा सुमारे एक आठवडा ते चंद्राच्या कक्षेत फिरेल. त्यानंतर ते चंद्राच्या दक्षिण भागात लँड करेल. यामुळे चांद्रयान-३ आणि लूना-२५ या दोन्ही यानांची लँडिंगची तारीख जवळपास सारखीच असू शकते. (Russia Luna 25)

दोघांचे मिशन वेगळे

इस्रोची चांद्रयान-३ मोहीम आणि रशियाची चांद्रमोहीम या दोन्ही वेगळ्या आहेत. भारताचं चांद्रयान हे दोन आठवडे चंद्रावर प्रयोग करण्यासाठी डिझाईन केलं आहे. तर, लूना-२५ हे वर्षभर चंद्रावर असेल. चंद्रावरील पाण्याचं अस्तित्व तपासण्यासाठी लूना चंद्राच्या पृष्ठभागाचे ६ इंच खोलपर्यंत नमूने गोळा करेल. ही मोहीम २०२१ साली राबवण्यात येणार होती, मात्र काही कारणांमुळे ही मोहीम लांबली होती. (Roscosmos Moon Mission)

दोन्ही यानांची टक्कर होईल?

जवळपास एकाच दिवशी लँडिंग होणार असल्यामुळे दोन्ही यानांची टक्कर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, असं काही होणार नसल्याचं रोस्कोस्मोसने म्हटलं आहे. चंद्राच्या दक्षिण भागात भरपूर जागा आहे. तसंच दोन्ही यानांची लँडिंगची जागा वेगवेगळी आहे. त्यामुळे दोघांची टक्कर होण्याची भीती आजिबात नाही, असं रशियाच्या अंतराळ संस्थेने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT