Chandrayaan-3 Gaganyaan eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 : चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे 'गगनयाना'ला मिळाला बूस्ट! इस्रो आता वापरणार 'ह्यूमन रेटेड' रॉकेट

LVM3 हे इस्रोचं सर्वात विश्वासार्ह रॉकेट असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असणाऱ्या चांद्रायन-३ ने शुक्रवारी यशस्वी उड्डाण केले. आता या चांद्रयानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू आहे. दरम्यान, इस्रोच्या या यशामुळे आता पुढील गगनयान मोहिमेला मोठा बूस्ट मिळाल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

या मोहिमेसाठी इस्रोने आपलं सर्वात मोठं एलव्हीएम-३ रॉकेट वापरलं होतं. यालाच फॅट बॉय असंही म्हटलं जातं. या रॉकेटने चांद्रयानाला सुरक्षितपणे पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत सोडलं आहे. त्यामुळे, हे आपल्याकडील सर्वाधिक विश्वासार्ह रॉकेट असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं चांद्रयान-३ चे मिशन डिरेक्टर ए. मोहन कुमार म्हणाले. कुमार हे एलव्हीएम-३ चे प्रोजेक्ट डिरेक्टर देखील आहेत.

गगनयानसाठी अपडेट

गगनयान या मोहिमेद्वारे भारत अवकाशात पहिल्यांदाच मानवाला पाठवणार आहे. एखाद्या रॉकेटसोबत मानवांना घेऊन जाणारं अवकाशयान न्यायचं झाल्यास, ते रॉकेट ह्यूमन-रेटेड असणं गरजेचं आहे. यानातील लोकांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या एलव्हीएम-३ रॉकेटमध्ये गरजेनुसार अपडेट करण्यात येणार आहेत.

टेस्टिंग सुरू

इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्यूमन-रेटेड रॉकेटची चाचणी इस्रोने आधीपासूनच सुरू केली आहे. चांद्रयान-३ मोहिमेसाठी वापरण्यात आलेल्या एलव्हीएम-३ रॉकेटमध्येही काही ह्यूमन-रेटेड भाग वापरण्यात आले होते. या रॉकेटमधील L110 विकास इंजिन, मोटर्सवरील सॉलिड स्ट्रॅप ह्यूमन रेटेड होते.

गगनयान लाँच व्हेईकलच्या सॉलिड, लिक्विड आणि क्रायोजेनिक प्रोपल्शन मॉड्यूल्सची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. याव्यतिरिक्त रॉकेटचे इतर भागही ह्यूमन-रेटेड म्हणता येईल इतपत तयार आहेत; असंही सोमनाथ यांनी स्पष्ट केलं. इस्रोच्या आगामी मोहिमांमध्ये ह्यूमन-रेटेड एलव्हीएम-३चा वापर केला जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

चांद्रयान-३

दरम्यान, शुक्रवारी चांद्रयान-३ मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. हे यान सध्या पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत असून, चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. साधारणपणे २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रापर्यंत पोहोचेल. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण भागात सुरक्षितपणे उतरण्याचा प्रयत्न हे करणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT