Chandrayaan 3 Sakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan - 3 : चंद्रावरील रहस्यांच्या शोधासाठी प्रज्ञान रोव्हरने सुरू केला प्रवास; इस्रोने शेअर केला Video

प्रज्ञान रोव्हर शिवशक्ती पॉइंटभोवती फिरत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chandrayaan - 3 : चांद्रयानाच्या लँडर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले असून रोव्हर आता चंद्रावर फिरत आहे. लँडरमधील कॅमेऱ्यात रोव्हरचा प्रवास कैद झाला आहे. इस्रोने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर करत माहिती दिली आहे.

"प्रज्ञान रोव्हर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी शिवशक्ती पॉइंटभोवती फिरत आहे." असं कॅप्शन टाकून इस्रोने व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये रोव्हर चंद्रावर फिरत असल्याचं दिसत आहे.

प्रज्ञान रोव्हर लँडरमधून खाली उतरतानाचा व्हिडिओ इस्रोकडून शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता रोव्हर चंद्रावर फिरत असून चंद्रावर असलेल्या मातीचे नमुने, मातीमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणाचा शोध, लँडरचे फोटो काढणे या गोष्टी करण्यात येणार आहेत.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांद्रयान मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांना बंगळुरू येथील इस्रो सेंटरमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी चांद्रयान - ३ ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असं नावंही दिले. त्याचबरोबर चांद्रयानाने ज्या दिवशी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं त्या दिवशी म्हणजे २३ ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT