Chandrayaan 3 It will land in southern hemisphere of moon on August 23 at 5 47 pm isro.dos
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : ‘चांद्रयान-३’ चंद्राच्या उंबरठ्यावर! चंद्राच्या दक्षिण गोलार्धात २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता उतरविणार

‘चांद्रयान-३’ चंद्रावर उतरविण्याच्या दिशेने भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शेवटचे व महत्त्वपूर्ण पाऊल गुरुवारी टाकले.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : ‘चांद्रयान-३’ चंद्रावर उतरविण्याच्या दिशेने भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शेवटचे व महत्त्वपूर्ण पाऊल गुरुवारी टाकले. प्रोपल्शन मोड्युलपासून विक्रम लँडर वेगळे करण्याची प्रक्रिया आज दुपारी सव्वाच्या सुरळीत पार पडल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये ‘इस्रो’ने ही माहिती दिली आहे. ‘‘लँडर मोड्युल (एलएम) म्हणाले, की मला इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद मित्रा!. प्रोपल्शन मोड्युलपासून (पीएम) ‘एलएम’ यशस्वीपणे वेगळे झाले. उद्या सायंकाळी चारच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुमारास वेग कमी करून ‘एलएम’ आणखी खालच्या कक्षेत जाण्यास सज्ज असेल,’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

लँडर सध्या चंद्राच्या शेवटच्या कक्षेत असून त्याचे चंद्रापासूनचे अंतर केवळ १५० किलोमीटर आहे. अशा प्रकारे यान चंद्राच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धाच्या भागात २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता यान उतरविण्याचे नियोजन आहे. त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

‘पीएम’ आणि ‘एलएम’चे कार्य

लँडरला योग्य स्थळी सोडल्यानंतर प्रोपल्शन मोड्युल हे सध्याच्या कक्षेत पुढील अनेक महिने भ्रमण करणार आहे. त्यावरील ‘शेप’ हे उपकरण पृथ्वीच्या वातावरणाचा, तेथून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचा अभ्यास करणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर १४ दिवस पाण्याचा शोधासह अन्य प्रयोग करणार आहे.

यान सुरक्षित उतरण्यासाठी

  • प्रोपल्शन मोड्युलपासून वेगळे झाल्यानंतर आता विक्रम लँडरचा वेग कमी करण्यात येईल

  • लँडरपासून चंद्राचे किमान अंतर ३० किलोमीटर ठेवण्यात येईल

  • सर्वांत कमी अंतरावरूनच चंद्रावर लँडर सहजपणे उतरविण्याचा प्रयत्न होईल

  • सुमारे ३० किलोमीटर उंचावरून चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरविण्याचा प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण असेल

  • लँडरला परिभ्रमण करत ९० अंशाच्या कोनातून चंद्राच्या दिशेने प्रवास करावा लागेल

  • चंद्रावर उतरविण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘चांद्रयान-३’चा वेग प्रति सेकंद १.६८ कि.मी.असा ठेवावा लागेल

  • थ्रस्टरच्या मदतीने वेग कमी करीत यान चंद्रावर सुरक्षितपणे उतरविले जाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT