Chandrayaan 3 Landing Date eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Landing Date : चंद्रावर कधी उतरणार 'चांद्रयान-3'? इस्रोने सांगितली अधिकृत तारीख अन् वेळ

Chandrayaan 3 Update : चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्ही इस्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Sudesh

ISRO Moon Mission : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. चांद्रयानाच्या चंद्राच्या कक्षेतील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, आता केवळ लँडिंगची प्रतीक्षा आहे. यातच इस्रोने एक्स पोस्ट करत 'चांद्रयान-3'च्या लँडिंगची तारीख अन् वेळ सांगितली आहे.

कधी होणार लँडिंग

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे लँडिंग होईल. सध्या चांद्रयान-3 सुस्थितीत असून, लँडिंगसाठी विक्रम सज्ज असल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्ही इस्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. यासोबतच, DD नॅशनल टीव्हीवर देखील याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. सोबतच, इस्रोच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवर देखील हा ऐतिहासिक क्षण लाईव्ह पाहता येणार आहे.

बुधवारी सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी थेट प्रक्षेपणास सुरुवात होईल, असं इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे. तसंच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरेल.

रशियाची मोहीम अयशस्वी

दरम्यान, चांद्रयान-3 पूर्वीच रशियाचं लूना-25 हे चंद्राच्या दक्षिण भागात लँड होणार होतं. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे लूना 25 चं लँडर चंद्रावर क्रॅश झालं. यामुळे रशियाचं स्वप्न भंगलं आहे. केवळ रशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी ही एक दुर्दैवी घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT