Chandrayaan 3 Live Streaming eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Live Streaming : लाईव्ह पाहता येणार 'चांद्रयान-3'ची लँडिंग; मोबाईलवर मिळेल नोटिफिकेशन! जाणून घ्या कसं?

ISRO Moon Mission : 'चांद्रयान-3' हे उद्या (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल.

Sudesh

Chandrayaan-3 Landing Live : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 'चांद्रयान-3' हे उद्या (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल. संपूर्ण देशासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असणार आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्याची तुम्हालाही संधी आहे. कारण, चांद्रयानाच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे.

बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी लँडिंगची प्रक्रिया आणि त्याचं थेट प्रक्षेपण सुरू केलं जाईल. घरी बसून टीव्हीवर हे लाईव्ह पाहण्यासाठी तुम्हाला डीडी नॅशनल हे चॅनल लावावं लागेल. तसंच, तुमच्या स्मार्टफोनवर देखील तुम्ही चांद्रयानाचं लँडिंग लाईव्ह पाहू शकता.

मोबाईलवर कसं पाहणार?

मोबाईलवर चांद्रयानाचं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्हाला इस्रोच्या फेसबुक किंवा यूट्यूब चॅनलवर जावं लागेल. यूट्यूबवर @isroofficial5866 या नावाने हे चॅनल आहे. सोबतच इस्रोच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन देखील तुम्ही लाईव्ह पाहू शकता. याव्यतिरिक्त नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही चांद्रयान-3चं लँडिंग पाहू शकता

अशी मिळेल नोटिफिकेशन

चांद्रयान-3 च्या लँडिंगचं प्रक्षेपण सुरू झालं आहे, याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला मोबाईलवर मिळू शकते. यासाठी तुम्हाला यूट्यूबवर इस्रोच्या पेजला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन सुरू करावे लागतील. यानंतर लाईव्ह सुरू झाल्यानंतर यूट्यूब तुम्हाला त्याबाबत नोटिफिकेशन देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT